पुणे पोलीसांकडून मोठ शस्त्रसाठा जप्त, तिघांना अटक

गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाने ही कारवाई केली
पुणे ( प्रविण शेंडगे ) : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत शस्त्रसाठा जप्त केला आहे. तीन लाख 50 हजार रुपये किमतीचे 11 पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. सराईत गुन्हेगारांसह तिघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.ज्ञानेश्वर उर्फ रुद्रा सर्जेराव डुकरे (वय 21) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्यासोबतच निखिल उर्फ सनी बाळासाहेब पवार (वय 23), युवराज बापू गुंड (वय 24) आणि अमोल नवनाथ तांबे (वय 27) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना त्यांना एक व्यक्ती पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ज्ञानेश्वर डुकरे याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत तीन पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे सापडली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत इतर आरोपींची नावे सांगितली. त्यांच्या ताब्यातून पिस्तुल जप्त करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी एकूण अकरा पिस्टल जप्त केले आहेत. लोणीकंद पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments