Hot Posts

6/recent/ticker-posts

नवनीत राणांची 'पोलखोल'; पोलिस आयुक्तांनी केला दाम्पत्याला चहापानाचा व्हिडीओ ट्विट

नवनीत राणांची 'पोलखोल'; पोलिस आयुक्तांनी केला दाम्पत्याला चहापानाचा व्हिडीओ ट्विट

मुंबई (नासिकेत पानसरे):-नवनीत राणांची 'पोलखोल'; पोलिस आयुक्तांनी केला दाम्पत्याला चहापानाचा व्हिडीओ ट्विट!; खातरजमा न करता बिनबुडाचे आरोप करणारे फडणवीसही तोंडावर पडले; जबाबदार पदाचे भान न ठेवता केलेला उतावीळपणा फडणवीसांच्या अंगाशी, इतकी अस्वस्थता येतेय कशातून?खासदार नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर मागासवर्गीय असल्याने पाणाी न दिल्याचा व अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला होता. या आरोपावर आता मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याचा पोलिस ठाण्यातला चाहापानाचा व्हिडीओ ट्विट करत पोलखोल केली आहे. या व्हिडिओत नवनीत राणा या आरामात चहापान करताना स्पष्ट दिसत आहेत.मुंबई पोलिस आयुक्त संजय पाडे यांनी राणा दाम्पत्यांचे आरोप यापूर्वीच फेटाळले आहेत. आता त्यांनीच हा पोलखोल व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत राणा दाम्पत्य चहापान करताना दिसत आहे. राणा दाम्पत्य बसलेल्या टेबलावर बिस्लेरी कंपनीची पाण्याची बॉटल आणि चहा पण स्पष्ट दिसतोय. या पोलखोलमुळे राणा दांपत्याबरोबरच देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षाचेही हसे झाले आहे. त्यांचा उतावीळपणा आणि खोटारडेपणा जगासमोर आला आहे. दरम्यान, कालच मुंबई हायकोर्टाने पदाचे भान राखून जबाबदारीने वागा, अशा शब्दात लोकप्रतिनधींचे कान उपटले होते.

Reactions

Post a Comment

0 Comments