Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्राहक कल्याण फांऊडेशनच्या जिल्हा बैठकीचे आयोजन हवेलीत

ग्राहक कल्याण फांऊडेशनच्या जिल्हा बैठकीचे आयोजन हवेलीत

          हवेली (कटुसत्य वृत्त) : ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली हवेलीत जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले. 

          ग्राहक हा असंघटीत असल्याने ग्राहक कल्याण फांऊडेशनच्या वतीने जिल्हा बैठकीत तालुक्यातील संघटनात्मक बांधणी, तालुका प्रतिनिधी यांना ताकद देण्यासाठी कार्यकर्ता जोडी अभियान जिल्हात राबवणार असल्याचे बैठकीत सर्वानुमते ठराव पास करण्यात आला. जिल्ह्यात आरोग्य विषयक दवाखाने, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, व सर्व लशी यांची उपलब्धतेची नोंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या. 

          यावेळी राज्य सदस्य श्री अस्लम तांबोळी यांनी मार्गदर्शन केले. बैठकीमध्ये जिल्हा उपाध्यक्ष श्री अनिल नेवसे जिल्हा कार्यवाहक दिलावर तांबोळी, जिल्हा कोषाध्यक्ष श्री पोपटराव साठे, हवेली तालुका अध्यक्ष सुनील थोरात, दौंड तालुका अध्यक्ष दिगंबर नेवसे, महिला प्रतिनिधी सविता सोनवणे तसेच ग्राहक कल्याण फाउंडेशन चे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

          पुणे जिल्हा सचिव सतिश थिटे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. हवेली तालुका अध्यक्ष सुनिल थोरात यांनी आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments