भो़ंग्या संदर्भातील सर्व पक्षीय बैठकीस भाजपाची दांडी

मुंबई,(कटूसत्य वृत्त):- राज्य सरकारने बोलविलेल्या सर्व पक्षीय बैठकीला भाजपाच्या नेत्यांनी दांडी मारली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टिकास्त्र सोडले.यावेळी त्यांनी नवनीत राणा, हनुमान चालिसा, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आजी दौरा यांसह विविध विषयांवर भाष्य केलं. महाराष्ट्रात जणू काही यांनी युद्धच जिंकलं आहे, अशा अविर्भावात ते आजीच्या भेटीला गेल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. तसेच या भेटीवरुन मुख्यमंत्र्यांवर टिकाही केली.आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले होते. राणा यांना रोखण्यासाठी हजारो शिवसैनिक मातोश्री निवासस्थानी जमले होते. दरम्यान या शिवसैनिकामध्ये एका ८० वर्षांच्या आजींनी लक्ष वेधून घेतले होते. 'झुकेगा नही' म्हणत या आजींनी केलेल्या आंदोलनाची दखल खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब या आजींची घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीवरून मनसेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्या आजीचा सत्कार केला पाहिजे त्या निमित्ताने तरी बाहेर पडले. खोचक टोला लगावला होता.आता देवेंद्र फडणवीस यांनीही या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे.हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही, तर मग काय पाकिस्तानात जाऊन म्हणायची का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. तसेच ''आणि मग काय कुठल्या आजीकडं मुख्यमंत्री जातात. जणूकाही ते मोठं युद्ध जिंकले आहेत. अरे एसटी संपातील आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्याच्या घरी गेले असता, एखाद्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी गेले असता तर समजलं असतं,'' असे म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या आजी भेटीवर टिका केली. तसेच आजीकडे गेल्यावर आजीने काय सुनावलं हे आपण सगळ्यांनी बघितलंय त्यांनी कुठे जावं हा त्यांचा संबंध आहे त्यावर मला अधिक बोलायचं नाही, असेही फडणवीस यांनी म्हटलं.एकाद्या महिला खासदाराला नामोहरम करण्यासाठी पहिल्या दिवशी रिमांडमध्ये एक कलम नंतर राजद्रोहाचं कलम म्हणजे हनुमान चालिसा म्हटल्यावर राज्य उलटवलं जात असा कट होतो.यापेक्षा हास्यास्पद काय असा सवाल करीत हनुमान चालिसा म्हटल्याने राजद्रोह होत असेल तर आम्ही रोज म्हणणार असे म्हणत त्यांनी हनुमान चालिसा म्हणून दाखविली.तुरूंगात अत्यंत हिन दर्जाची वागणुक वागणुक दिली.पाणी प्यायला दिले नाही तर वॉशरूमलाही जायलाही परवामनगी दिली नाही. त्यांना वाईट पद्धतीने वागविले जात असल्याचे सांगत त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली असल्याचे राणा यांनी सांगितल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
0 Comments