सोलापूरमध्ये भीषण अपघात; चिमुकल्यासह ५ जणांचा मृत्यू
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती चौकात ईनोव्हा कारने मालवाहू ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात १ वर्षाच्या चिमुकल्यास पाच जणांचा मृत्यू झाला.मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका लहान बाळाचा समावेश आहे. या दुर्घटनेत अन्य चौघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारीच लातूर जिल्ह्यात अपघात झाला होता.सचिन शितोळे (वय ३५), दिलीप जाधव (३५), सोनाबाई जाधव (५५), लाडु जाधव (१ वर्ष) आणि आरोही जाधव (७) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. हा भीषण अपघात सोमवारी दुपारी घडला. हे सर्वजण पुण्याहून हुबळीला निघाले होते. या अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून क्रेनच्या सहाय्याने पाठीमागील भागात रुतलेली इनोव्हा काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले.या दुर्घटनेत वर्षा शितोळे, रेखा जाधव, दिशा जाधव आणि विनायक घोरपडे या गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मृत आणि जखमी सर्वजण मिरज येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात आले. मार्केटयार्ड परिसरातील सर्व्हिस रोडजवळ हा भीषण अपघात झाल्यानंतर दोन क्रेनच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले.
0 Comments