Hot Posts

6/recent/ticker-posts

आमदार राजेश राठोड यांची विधान परिषदेच्या काँग्रेस पक्षप्रतोदपदी नियुक्ती

आमदार राजेश राठोड यांची विधान परिषदेच्या काँग्रेस पक्षप्रतोदपदी नियुक्ती

            मुंबई, (नासिकेत पानसरे): काँग्रेसचे विधान परिषद सदस्य राजेश धोंडीराम राठोड यांची काँग्रेसच्या पक्षप्रतोद पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या बैठकीत आमदार राठोड यांच्याकडे पक्षप्रतोदपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

            आमदार राजेश राठोड यांनी यापूर्वी जालना जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्हा परिषद सभापती, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशा विविध पदावर काम केले आहे. बंजारा समाजाचे ते लोकप्रिय नेते आहेत. त्यांचा विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असतो.

            आमदार राजेश राठोड यांची पक्षप्रतोदपदी नियुक्ती झाल्याबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments