एसटी बसच्या धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर; 2 ठार, 4 गंभीर जखमी
.png)
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन घरी परत जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची घटना घडली आहे. भरधाव एसटी बस आणि आणि कारची समोरासमोर धडक झाल्यामुळे भीषण अपघातात अपघातात दोन भाविक ठार झाले आहे.
पंढरपूर तालुक्यातील भैरवनाथ वाडीजवळ नाईक नवरेमळा येथे आज रविवारी (दि.१७) सकाळी साडेअकरा वाजता ही दुर्घटना घडली. यात दोन ठार तर 4 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पंढरपूर सोलापूर रोडवर देगाव परिसरात हा अपघात झाल. सोलापूर येथील एक कुटुंब आणि इतर सदस्य पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला मारूती सुझुकी इर्टिगा (एमएच ११ बीव्ही १९४२) गाडीने आले होते.
विठ्ठलाचे दर्शन घेऊन सर्व जण सोलापूरकडे निघाले होते. देगाव परिसरात गाडी पोहोचली असता समोरून येणाऱ्या एसटी बसने कारला जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. या अपघात दोन जण ठार झाले आहे तर चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अशोक जाधव, नितीन चवरे, सुजित उबाळे घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात झाल्याचे समजताच परिसरातील नागरिक मदतीसाठी घटनास्थळी धावले. यामध्ये चार चाकीमधील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. शिवराज प्रल्हाद भोसले आणि दत्ता रामा भोसले अशी मयतांची नाव आहे. तर व्यंकट मारुती भोसले, शरद वसंत भोसले, सुनील किसन भोसले, सचिन किसन कदम, शंकर माधव मोटे अशी जखमींची नाव आहे. सर्व जखमींना पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
0 Comments