Hot Posts

6/recent/ticker-posts

बार कौन्सिल तर्फे ‍अ‍ॅड विजय मराठे यांना जेष्ठ विधिज्ञ पुरस्कार प्रदान

बार कौन्सिल तर्फे ‍अ‍ॅड विजय मराठे यांना जेष्ठ विधिज्ञ पुरस्कार प्रदान

          सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा तर्फे ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या वकील परिषदेमध्ये अ‍ॅड विजय मराठे यांना जेष्ठ विधिज्ञ पुरस्काराने गौरविण्यात आले.

          विधीक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा तर्फे प्रदान करण्यात येणारा यावर्षीचा जेष्ठ विधिज्ञ पुरस्कार अ‍ॅड विजय मराठे यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला यावेळी बार कौन्सिलचे मा. अध्यक्ष अ‍ॅड मिलिंद थोबडे, अध्यक्ष अ‍ॅड व्ही डी साळुंके, उपाध्यक्ष अ‍ॅड राजेंद्र उमाप व बहुसंख्य वकीलांची उपस्थिती होती.

          अ‍ॅड विजय मराठे यांनी सन 1972 साली वकीली व्यवसायास सुरुवात केली, तेंव्हापासून त्यांनी दिवाणी, फौजदारी, सहकार क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या वकीली करीत विधीक्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले. जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करत असताना मिळालेले संपुर्ण मानधन त्यांनी कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांचे कल्याण निधी करीता दिली व कोरोना काळात पंतप्रधान सहाय्यता निधीत पाच लाख रूपये दिले. अ‍ॅड विजय मराठे यांचे विधीक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अ‍ॅड मिलिंद थोबडे यांनी अ‍ॅड विजय मराठे यांना जेष्ठ विधिज्ञ पुरस्कार देण्याबाबत बार कौन्सिल कडे प्रस्ताव दिला होता व त्यांच्या विशेष प्रयत्नातून बार कौन्सिलमार्फत अ‍ॅड विजय मराठे यांना पुरस्कृत करण्यात आले.

Reactions

Post a Comment

0 Comments