Hot Posts

6/recent/ticker-posts

SP तेजस्वी सातपुतेंचा अनोखा प्रयत्न! गुन्ह्यांची पेन्डन्सी झाली कमी

 SP तेजस्वी सातपुतेंचा अनोखा प्रयत्न! गुन्ह्यांची पेन्डन्सी झाली कमी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रामीणमध्ये विविध पोलिस ठाण्यात दरवर्षी साधारणत: आठ ते साडेआठ हजार गुन्हे दाखल होतात. मंगळवेढा, करमाळा, बार्शी, मोहोळ या तालुक्‍यात प्रमाण अधिक आहे. गुन्ह्यांचा तपास जलगतीने व्हावा, गुन्हेगारांविरुध्द दोषारोपपत्र लवकर न्यायालयात दाखल व्हावे लागते. पण, ग्रामीण पोलिस दलात गुन्ह्यांचा तपास करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने जवळपास तीनशे कर्मचाऱ्यांना (ज्यांना तपास जमत नव्हता असे) त्यांना तपासाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.राज्य राखीव पोलिस बल, आर्मी आणि मुख्यालयात गार्ड म्हणून सातत्याने ड्यूटी केलेल्यांना गुन्ह्यांचा तपास फारसा जमत नव्हता. त्यांचा कधीच तपासाशी संबंध आलेला नसतो. गुन्ह्यांची पेन्डन्सी वाढत असतानाच त्याची निर्गती वेळेत झाल्यावर ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना लवकर न्याय मिळतो. पण, तपास अधिकारी कमी असल्याने काही गुन्ह्यांचा तपास बरेच महिने प्रलंबित राहतो. दोन-तीन गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यावर पुन्हा नव्या गुन्ह्यांचा तपास सोपविला जातो. त्यावेळी ठरावीक कर्मचाऱ्यांवर ताण वाढतो. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण जवळपास 50 टक्‍क्‍यांपर्यंत होते. मात्र, नव्याने प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमुळे आता पेन्डन्सीचे प्रमाण 25 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी झाले आहे. त्यामध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे, भारतीय दंड विधान कायद्याअंतर्गत दाखल गुन्हे, विशेष कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात फुस लावून मुला-मुलींना पळवून नेणे, जबरी चोरी, घरफोडी, मारामारी, खून, या गुन्ह्यांचे प्रमाणही आता कमी झाले आहे. त्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचाही मोठा हातभार लागला आहे.ज्यांचा गुन्ह्यांच्या तपासाशी कधीच संबंध आला नाही, त्या पोलिस अंमलदारांना तपास कामात सहभागी करून घेण्यासाठी प्रशिक्षण दिले. आता जवळपास 300 नवीन तपास अधिकारी ग्रामीण पोलिस दलात वाढल्याने गुन्ह्यांची निर्गती वाढली असून पेन्डन्सीही 25 टक्‍कक्‍यांपेक्षाही कमी झाली आहे.तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर

Reactions

Post a Comment

0 Comments