युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी सुमित भोसले यांची निवड
सोलापूर शहर जिल्ह्यातून सरचिटणीस पदासाठी एकमेव उमेदवार निवडून आला आहे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची १२ नोव्हेंबर २०२१ ते १२ डिसेंबर २०२१ या काळात निवडणूक घेतली होती.याचा निकाल सोमवारी सायंकाळी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या या संघटनात्मक निवडणुकीत #सरचिटणीस/ प्रदेश महासचिव ह्या पदासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून 7 जण निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी एकमेव सुमित भोसले हे १५१२४ मते घेऊन निवडून आले आहेत. सुमित भोसले हे गेल्या 15 वर्षांपासून काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांनी या अगोदर विविध पदांवर काम केलंय. एन एस यु आय चे शहराध्यक्ष तसेच युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि सरचिटणीस या पदांवरही त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या या निवडीबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार प्रणिती शिंदे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे पाटिल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे आदींनी त्यांचे अभिनंदन केलं. सुमित भोसले यांनी या विजयाचे श्रेय मी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीतदादा तांबे पाटिल ह्यांना दिलंय. या निवडीबद्दल महाराष्ट्रातून तसेच सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून सुमित भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
0 Comments