महीला दिनाच्या निमीत्त सिदखेड गावातील 8 महीलाना हिरकणी पुरस्कार
सिदखेड(कटूसत्य वृत्त):- शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिदंखेड ता द सोलापूर येथील 8 महीलाना जागतीक महीला दिना निमित्त " हिरकणी " पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष मल्लेशी करके यांनी जाहीर केले आहे.महीला दिना निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सरपंच काशीबाई गावडे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणविस्तार अधीकारी जयश्री सूतार यांच्या शुभहस्ते गावातील विवीध क्षेत्रातील महीलाचे हिरकणी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या मध्ये सुरय्या मकानदार सुवर्णा गावडे जयश्री कंदले संगीता माने सलीमा ताबोळी अंबीका गायकवाड राजश्री गुरव सावित्री कुलकर्णी अशा आठ महिलांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
0 Comments