ओबीसींसाठी नव्याने करण्यात आलेल्या विधेयकाचे स्वागत - महेश तपासे
मुंबई (कटूसत्य वृत्त):-ओबीसी समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात विधीमंडळात एक नवीन सुधारणा विधेयक एकमताने मंजूर झाले असून या विधेयकाचे राष्ट्रवादी काँग्रेस स्वागत करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत राजकीय आरक्षण मिळावे ही महाविकास आघाडी सरकारची भूमिका होती आणि आहे असेही महेश तपासे म्हणाले.ओबीसी समाजाला मनपा, नप,जिप, पंस या सर्वांमध्ये राजकीय आरक्षण मिळू शकेल यादृष्टीने हे विधेयक आहे. ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका महाविकास आघाडी सरकारने सातत्याने मांडली आहे. याचा पाठपुरावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला त्याबद्दल महेश तपासे यांनी आभार मानले आहेत.
0 Comments