Hot Posts

6/recent/ticker-posts

न.पा.ने घरपट्टी व पाणीपट्टी वरील जाचक व्याज माफ करावे

न.पा.ने घरपट्टी व पाणीपट्टी वरील जाचक व्याज माफ करावे




सामाजिक कार्यकर्ते संदीप भराठे यांचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन


कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- कोरोनाच्या संकटामुळे सर्व सामान्य नागरीक आर्थीक दृष्टया अडचणीत आले आहेत.व्यापार पेठेत खुप मंदी आहे.महागाई वाढत चालली आहे. अशा संकटकाळात कुर्डूवाडी नगरपालिके कडून घरपट्टी व पाणीपट्टी वर येत असलेले जाचक असे व्याज माफ करण्यात यावे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते व ओमराजे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदीप भराटे यांनी मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी त्यांच्या सोबत निवेदन देताना माजी नगरसेवक सोमनाथ देवकते ते उपस्थित होते.निवेदनात म्हटल्या प्रमाणे नःपा मध्ये घर पट्टी व पाणी पट्टी भरावयास  नागरिक गेले असता तेथे थकीत बीलाला व्याज दर लावले जातय कर्मचाऱ्यांना विचार पुस केली तर ते कॉम्प्युटर फिड आहे असे म्हणत आम्ही रकमेवरील व्याज कमी करू शकत नाही, म्हणुन ओमराजे बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी व मुख्याधिकारी यांना घर पट्टी व नळ पट्टी वरील जाचक व्याज माफ करावे असे नम्र विनंतीचे निवेदन दिले आहे. 

Reactions

Post a Comment

0 Comments