Hot Posts

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिन विशेष - माढ्यातील महान स्वातंत्र्य सेनानी स्व. सौ.लीलावती फुलचंद दोशी

 जागतिक महिला दिन विशेष -  माढ्यातील  महान स्वातंत्र्य सेनानी स्व. सौ.लीलावती फुलचंद दोशी




माढा (कटूसत्य वृत्त):-  दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे वस्त्रोद्योगातील काम करणाऱ्या महिलांनी सामान्यपणे मोठी ऐतिहासिक निदर्शने केली त्यांनी कामाचे तास कमी करणे, सुरक्षितता  इत्यादी मागण्या केल्या जगाच्या इतिहासात अशा प्रकारे स्त्रियांनी संघटित होऊन केलेला हा पहिलाच मोठा संघर्ष मानला जातो. पुढे १९१० मध्ये   विविध देशातील महिला प्रतिनिधी सहजगत्या यांनी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा ठराव पास झाला.  तेव्हापासून  हा दिवस स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यासाठी जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.आई, मुलगी, पत्नी ,मैत्रीण ,मावशी, आजी इ. नाती जोपासावी लागतात.तरीही सृष्टीचे जीवन चक्र अविरतपणे चालू ठेवण्याचे कार्य करते.प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा स्त्री असते. स्त्री शिवाय कुटुंब  नाही व कुटुंबाशिवाय समाज नाही सासर माहेरच्या दोन्ही घरांना नकळतपणे जोडते ती स्त्री ,आपले मूल संस्कारशील, अद्वितीय घडावे म्हणून जिवाचे रान करते, मूल पोटात वाढवण्यापासून  ते सुसंस्कृत व्यक्ती होण्यापर्यंत जबाबदारी स्त्री विनातक्रार पार पडते स्त्री शक्ती फक्त कुटुंबासाठी लढत नाही तर देशासाठीही बलिदान देते.जिजाऊ राणीसाहेब, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, यासारख्या अनेक स्त्रिया देशरक्षणासाठी रणरागिनी झाल्या.अशाच एक महान स्वातंत्र्य सेनानी  स्व. सौ. लीलावती फुलचंद दोशी,माढा या उद्योजक राजेश दोशी व डाॅ. पंकज दोशी यांच्या आज्जी यांनीही आपल्या कुटुंबा सोबतच देशरक्षणासाठी स्वातंत्र्यलढ्यात स्वतः सहभागी घेतला आणि तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी अतुलनीय असे योगदान दिले होते. अशा महान स्त्री स्वातंत्र्य सेनानींस महीला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम.

Reactions

Post a Comment

0 Comments