आदर्श मध्ये सिंधुताईचे भव्य पेंटिंग काढून महिला दिन साजरा

कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- आदर्श पब्लिक स्कूल कुर्डूवाडी येथे विविध कार्यक्रम साजरे करून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ८२ कार्डशीट पेपरवरती सिंधुताई सपकाळ यांची भव्य अशी पेंटिंग हे विशेष आकर्षण ठरले.यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थिनी व महिला शिक्षिका यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या वेळेस संस्थेचे प्रकल्प संचालिका पूजा सुरवसे यांनी आपल्या मनोगतात महिलांनी स्वतःच्या पायावर सक्षम व्हावे असे मत व्यक्त केले.यावेळेस मुख्याध्यापिका शकीलाबी सय्यद,प्राथमिक विभाग प्रमुख आयेशा मुलाणी व प्रशालेतील सर्व महिला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यासाठी कला शिक्षक राहुल चंदनकर व प्रशांत चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments