शहरातील दुकानांची नाम फलक बोर्ड मराठीत करामोहोळ युवा सेनेने निवेदनाद्वारे केली मागणी
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-मोहोळ शहरासह परिसरातील प्रत्येक दुकानाचा प्रथमदर्शी नामफलक हा मोठ्या अक्षरात मराठी भाषेमध्ये करावा आणि तसे संबंधित दुकानांना सुचित करावे, अन्यथा येत्या पंधरा दिवसात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा युवासेना मोहोळ शहर शाखेच्या वतीने देण्यात आला आहे.याबाबत मोहोळ शहर युवा सेनेच्या वतीने मोहोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, मोहोळ शहरामधील प्रत्येक दुकानाचा व आस्थापनांचा प्रथमदर्शी नामफलक हा मोठ्या अक्षरात मराठी भाषेत अग्रस्थानी असावा. मोहोळ शहरातील सर्व दुकाने, आस्थापने यांच्या वरील पाट्या ह्या १५ दिवसात मराठीत न झाल्यास युवासेना मोहोळ शहर तीव्र स्वरूपाचं उग्र आंदोलन करेल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, युवासेना सहसचिव विपुल पिंगळे, युवासेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात युवासेना शहरप्रमुख सचिन जाधव यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी आनंद वाघमोडे, तुळजाराम धोत्रे, डॉ.गोपाळ शिराळ, विक्रांत मांडवे,उज्वल वाघमारे, आकाश पवार, गणेश होंनमाने, गणेश पवार, लखन पवार, प्रवीण जाधव,अजय जाधव, मुकेश जाधव, पप्पू जाधव, सोमनाथ जाधव, गणेश मेटकरी, विशाल कोळी, किशोर पवार शिवसैनिक उपस्थित होते.
0 Comments