Hot Posts

6/recent/ticker-posts

दक्षिण पोलीस ठाणे अक्कलकोट हद्द म्हणजेच अवैध धंदे व अवैध तस्करी यांचे माहेर घर

 दक्षिण पोलीस ठाणे अक्कलकोट हद्द म्हणजेच अवैध धंदे व अवैध तस्करी यांचे माहेर घर

                                                       

मैंदर्गी (कटूसत्य वृत्त):- दक्षिण पोलीस ठाणे अक्कलकोट हद्द म्हणजेच अवैध धंदे व अवैध तस्करी यांचे माहेर घर येथील कायदा सुव्यवस्था कोसळल्याने नागरिक तिव्र संतप्त व्यक्त करत आहे. याबाबत गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, पालक मंत्री, गृहमंत्रालय अधिकारी महोदय व पोलीस महासंचालक महोदय यांनी तात्काळ इकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागेश भंगर्गी यांनी केली आहे.मंत्री महोदय व गृह खाते मंत्रालय व पोलीस महासंचालक महोदय, मुंबई यांना दगी येथील जेष्ठ व निर्भीड पत्रकार व समाज सेवक नागेश भंगर्गी यांचे सत्य प्रतित्रेवर हा अर्ज योग्य ते करवाईसाठी व चौकशीसाठी सविनय पुर्वक लेखी निवेदन सादर करीत आहे. वि.वी की गेल्या पस्तीस वर्षापासून मैंदर्गी ओपी येथील दूरध्वनी फोन बंद केलेले आहे.सतत पाठपुरावा करूनही दूरध्वनी सेवे चालु करण्यात आलेली नाही या मैंदर्गी ओ पी खाली ११ गावांनी देखबाल आहे. आज दुरध्वनी शेवेला कीती महत्व आहे. हे पोलीस खात्याला कळते पण वळत नसल्याने परीसर भागातील नागरिक दुरध्वनीअभावी ञस्त होत आहे याची दखल तात्काळ घ्यावा व दुरध्वनी सेवा चालू करावा.अक्कलकोट तालुका हा सिमा सरहद्दीवर बसलेला तालुका आहे. शासकीय कारोबार सुरळीत व्हावा म्हणून दक्षिण पोलीस ठाणे व उत्तर पोलीस ठाणे असे विभागणी केलेले आहे. अक्कलकोट तालुका हे शहर नगरपालीका शहर आहे. मैंदर्गी , दुधनी हे नगरपालिका चे शहर आहे. दुधनी व मैंदर्गी करजगी तडवळ, जेऊर पान मंगळूर हैद्रा, नागणसूर वगैर दक्षिण पोलीस ठाणे हद्दीत समावष्ट आहे. दक्षिण पोलीस ठाणे हे एकच पोलीस ठाणे आहे. व मैंदर्गी करजगी येथे ओपी आहे बाकीचे ठीकाणी पोलीस बीट आहे. कर्नाटक राज्य सिमा लगत असल्याने कर्नाटक राज्यातील चोर, दरोडेखोर काळाबाजार वाले अवैध तस्करी करणारे सतत महाराष्ट्रात घुसून  गुटखा  चंदन गांजा, बनावट नकली नोट, बनावट दारु घातक शस्त्रे व कत्तल खान्याकडे जनावरे व त्यांचे मास राजरोस घेवून येतात व अवैध वाळू  तस्करी रोकणारे बहाद्दूर प्रमाणिक पोलीस येथे नाही आहे. दक्षिण पोलीस ठाणे येथील भ्रष्ट व लाचार कारभारमुळे अवैद्य धंद्याना पाठीसी घालून - भ्रष्ट व लाचार कारभार करित आहे. जसे श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे महाराज जसे आपल्या भक्त गणाना भिउ नकोस मी तुझ्या पाठीसी आहे. असे भ्रष्ट व लाचर कर्मचारी अवैध व्यवसावकांना आशिर्वाद दिले आहेत. यामुळे अवैध व्यवसाय खुलेआम च राजरोस चालत आहे.सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागाचे पोलीस अधिक्षक महोदया, श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी अवैध धंदे बीमोड करण्यासाठी व नामोनिशान मिटविण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करित आहे. परंतु भ्रष्ट लाचार पोलीस सातपुते ताई यांचे कामात अडथळा निर्माण करित आहे. हे एक खेदजनक बाब आहे. कायदा व सुव्यवस्था भंग झाल्याने नागरिक ञस्त आहे. पास्पोर्ट तयार करण्यासाठी संपूर्ण माहिती पुर्ण करण्यासाठी संबंधीत अधिकारी ५०० रुपये घेतल्या शिवाय पासपोर्टची  माहिती पुर्ण करित नाही व वर्तुणिकाचा दाखला देण्यासाठी १००० ते २००० रु घेतल्याशिवाय वर्तुणिकेचे दाखला देत नाही कायदा व सुव्यस्था व शांतता स्थापन करण्यासाठी अवैध धंदे व अवैध तस्करी निवारणसाठी मैंदर्गी व करजगी येथे पोलीस ठाणे होणे अत्यंत गरजेची बाब आहे. भ्रष्ट व लाचार कारोभार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची तात्कळ उचलबांगडी करावा अन्यथा मैदर्गी येथील व परिसर भागातील बचत गट महिला व दारु पीऊन मयत झालेला पत्तीची विधवा महिला आणि इतर कार्यकर्ता हे ३१ मार्च २०२२ रोजी मा.ना. मुख्यमंत्री महोदय मुंबई यांच्या कार्यालयासमोर आमरण बेमुदत प्राणांतिक उपोषणास बसणारे आहेत.



Reactions

Post a Comment

0 Comments