कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्वामी कृपेची गरज – अभिनेत्री मेसवाल
मैंदर्गी (कटूसत्य वृत्त):- नाट्य व सिनेसृष्टीतील एका विशिष्ट वळणावर आज आपले करिअर सुरू आहे. या क्षेत्रात आपल्यातील सुप्त कला गुणांना सादर करताना मोठा संघर्ष करावा लागतो. मला आशा आहे की आपल्या संघर्षांस नक्कीच स्वामी कृपेचे पाठबळ लाभेल. त्यामुळे या कलागुणांना वाव मिळण्यासाठी एक निस्सीम स्वामीभक्त या नात्याने स्वामी कृपेची गरज असल्याचे मनोगत अभिनेत्री मेसवाल यांनी व्यक्त केले. नुकत्याच त्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी बोलताना मेसवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी मेसवाल यांच्या कारकीर्दीचे नावलौकिक आपण ऐकून आहे. कोयता एक संघर्ष या चित्रपटातील / नाटकातील त्यांची भूमिका रसिकांना विशेष भावली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस स्वामी समर्थांचे कृपाशीर्वाद लाभावे याकरिता त्यांना स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन सत्कार केले असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, ढेपे सर, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, रवी मलवे, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, संजय पवार इत्यादी उपस्थित होते.
0 Comments