Hot Posts

6/recent/ticker-posts

"फडणवीसांच्या काळातच सुरू होते विरोधकांचे फोन टॅपिंग"

"फडणवीसांच्या काळातच सुरू होते विरोधकांचे फोन टॅपिंग"

 



मुंबई - देवेंद्र फडणवीस सरकारच्याच काळात आणि त्यांच्याच सांगण्यावरून विरोधकांचेफोन टॅपिंग सुरू होते. ही बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. माजी पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्या मार्फत हे टॅपिंग केले गेले आहे आणि त्या प्रकरणी त्यांच्या विरोधात आता पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे.त्यामुळे फडणवीस यांच्याकडून सध्या जे आरोप होत आहेत ते केवळ राज्यातील सत्ता आपल्या हातून गेली या नैराश्‍यातून होत आहेत अशी टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. ते म्हणाले की या विषयावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे योग्य ते उत्तर विधानसभेत देतील. मुंबई पोलिसांनी गेल्याच आठवड्यात रश्‍मी शुक्‍ला आणि अन्य पोलिस अधिकाऱ्यांवर शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांने फोन जून 2019 मध्ये टॅप केल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा केवळ राजकीय हेतूने करण्यात आलेला प्रकार होता असेही त्यांनी म्हटले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments