शासकीय योजनांच्या जागरचा आज झाला समारोपकलापथकांचे स्वागत; जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूरने जिल्ह्यात कलापथकांच्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांची व्यापक जनजागृती केली. जिल्ह्यात तीन कलापथकांच्या माध्यमातून 9 मार्चपासून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली होती. आज दि. 15 मार्च 2022 रोजी या जागरचा समारोप करण्यात आला. कलापथकांचे जिल्ह्यातून स्वागत होत असून या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.आज जय भवानी कलापथक सांस्कृतिक मंडळ जवळा यांनी योजनांबाबत मानेगाव (ता.माढा) येथे जनजागृती केली. यावेळी सरपंच तानाजी धनाजी लांडगे, उपसरपंच सिद्धेश्वर महादेव राऊत, मुख्याध्यापक अतुल आनंदराव देशमुख, सदस्य स्वाती अशोक शेळके, शितल सुभाष जोकार आदींसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर तालुक्यातील रोपळे (कव्हे) येथे जनजागृती करण्यात आली. यावेळी सरपंच वैशाली तात्यासाहेब गोडगे, उपसरपंच महानंदा शरद पाटील, सदस्य तानाजी सहदेव साळवे, अविनाश चंद्रकांत गोडसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. भीमानगर (रांजणी) येथेही ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.भैरव मार्तंड सांस्कृतिक कलामंच पंढरपूर यांनी आज करमाळा तालुक्यातील केत्तूर येथे येथे शासकीय योजनांची माहिती दिली. सरपंच विकास भगवान कोकणे, राजू बागल, शंकर शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी योजनांची माहिती घेतली. याच कलापथकाने तालुक्यातील कोर्टी येथेही योजनांबाबत जनजागृती केली. संजय रामा सोनवणे, बबनराव रामा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. वीट येथील कार्यक्रमालाही ग्रामस्थांनी दाद दिली. जिल्हा परिषद सदस्य बिभीषण आवटे, उपसरपंच समाधान कांबळे, श्रीरंग जाधव, सुभाष जाधव, सुभाष आवटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.महात्मा फुले ग्रामीण विकास संस्थेच्या दत्तात्रय येडवे आणि श्री. बिदरकर यांच्या कलापथकाने रड्डे येथे योजनांची जनजागृती केली. यावेळी सरपंच संजय कोळेकर, माजी सभापती दत्तात्रय कांबळे, ग्रा .पं सदस्य विजय सांगोलकर, तलाठी चव्हाण भाऊसाहेब, रमेश कसबे, पुंडलिक हेटकळे, उत्तम कांबळे, शिवा शिरनामे, रोहिदास कांबळे ( माजी तंटामुक्त अध्यक्ष ), सुभाष पुजारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. मुस्ती ता. दक्षिण सोलापूर येथे माजी सभापती भीमाशंकर जमादार यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी सरपंच नागराज पाटील, अप्पा हंगरगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments