Hot Posts

6/recent/ticker-posts

छ. शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, वाटंबरे प्रशालेस ' आदर्श शाळा ' पुरस्कार जाहीर.

 छ. शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, वाटंबरे  प्रशालेस ' आदर्श शाळा ' पुरस्कार जाहीर. 




【 पालकमंत्री दत्ता मामा भरणे व इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सोहळा होणार संपन्न】

वाटंबरे (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघा मार्फत दिला जाणारा सन- २०२१-२२ चा  "आदर्श शाळा" हा तालुका स्तरीय पुरस्कार छ. शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, वाटंबरे,ता.सांगोला या प्रशालेस जाहीर झाला आहे.या प्रशालेत सन 1968 पासून जे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये अधिकची भर घालुन नाविन्यपूर्ण उपक्रम आजही राबविले जातात.शाळेची गुणवत्तापूर्ण शिक्षण, कला,क्रिडा, पालक-शिक्षक संबंध, विद्यार्थी शिस्त,पर्यावरण पूरक इ.उपक्रम राबविण्यात येतात.या सर्व उपक्रमांची दखल घेऊन मुख्याध्यापक संघाने या या वर्षीचा आदर्श शाळा पुरस्कार प्रशालेस जाहीर केला आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. 27 मार्च 2022 रोजी सकाळी साडेनऊ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे पालकमंत्री दत्तात्रय 【मामा】भरणे पालकमंत्री सोलापूर.मा. जयंत आसगावकर शिक्षक आमदार पुणे विभाग पुणे.मा औदुंबर उकिरडे शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्या शुभहस्ते व भास्करराव बाबर शिक्षणाधिकारी माध्यमिक.डॉ. किरण लोहार शिक्षणाधिकारी प्राथमिक.सुभाषराव माने माजी अध्यक्ष मुख्याध्यापक संघ महामंडळ या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. हा आदर्श शाळा  पुरस्कार मिळाल्याबद्दल  प्रशालेचे अध्यक्ष मोहन पवार प्रशालेच्या सचिव पवार मॅडम तसेच प्रशालेच्य प्राचार्या  सुनंदा सोनवले मॕडम यांचेसह प्रशालेतील  सर्व शिक्षक शिक्षकेत्तर व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .

Reactions

Post a Comment

0 Comments