Hot Posts

6/recent/ticker-posts

संसाराच्या मोहजलामध्ये जरूर गुंता पण भगवंताला विसरू नका - ह भ प अनिल पाटील महाराज.

 संसाराच्या मोहजलामध्ये जरूर गुंता पण भगवंताला विसरू नका - ह भ प अनिल पाटील महाराज


तानाजीराजे खताळ पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मानवी जीवनामध्ये अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी माणूस संसाराच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. समस्या सोडविता सोडविता त्या मोह झाला मध्ये तो एवढा गुंतून जातो की ज्यांनी कर्म करण्यासाठी जन्माला घातले त्या भगवंतालाच विसरून जातो म्हणून माणसाने संसाराच्या मोजायला मध्ये जरूर अडकावे पण भगवंताचे नामस्मरण व भगवंताला विसरू नये. असा उपद्देश जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदीचे ह भ प अनिल पाटील महाराज यांनी श्रोत्यांना केला.लांबोटी येथील हॉटेल शंकरचे मालक कै. तानाजी खताळ यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यामध्ये ह-भ-प अनिल पाटील महाराज हे उपदेश करीत होते.जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा "शेवट तो भला !माझा बहु गोड झाला!! आलो  निजाच्या माहेरा ! भेटी रखुमाईच्या वरा" !! हा अभंग किर्तन सेवेसाठी घेण्यात आला होता.या किर्तन सोहळ्यास हॉटेल जय शंकरचे गणेश खताळ ,अक्षय खताळ ,रुद्राक्ष खताळ, अनिरुद्ध खताळ, संग्राम खताळ, विमल खताळ, सुवर्णा सलगर,ह भ प.अशोक काळे महाराज, प्रमोद मसलकर, गणेश जरग,अभि शिंदे, संजय  जरग, शाहीर जरग, आधी सह वारकरी संप्रदायातील मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.या किर्तन सोहळ्यासाठी काटी सावरगाव, खरसोळी ,लांबोटी , शिरापूर, कोळेगाव, अर्जुंसोंड, सावळेश्वर, भांबेवाडी ,मोरवंची आधी गावचे भजनी मंडळ सहभागी झाले होते. या कीर्तन सोहळ्यामध्ये काटी येथील कृष्णा कदम व अनसुर्डे येथील प्रमोद माने यांनी मृदुंग वादन केले. गायन आळंदी येथील प्रमोद सोळंके यांनी केले. माणसाने संसारामध्ये गुंरफटताना  आपली अलिप्तता नारळाच्या खोबऱ्याप्रमाणे आणि चिकू मधील बिया प्रमाणे सांभाळावी. गरांमध्ये राहून ही चिकूचा बी अंगाला गर लागू देत नाही. नारळाच्या टणक कवचाचा आधार घेत खोबरे आतमध्ये आनंदात जीवन कंठत असते अशाप्रकारे मानवाने ही जीवन जगावे अशी अपेक्षाही हभप अनिल पाटील महाराज यांनी व्यक्त केली.

Reactions

Post a Comment

0 Comments