लायन्स क्लब ऑफ सांगोला व पदाधिकारी विविध पुरस्कारांनी सन्मानित

ला.प्रा.धनाजी चव्हाण बेस्ट लायन ऑफ द रिजन
सांगोला (कटूसत्य वृत्त):- इटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज प्रांत ३२३४ ड १ विभाग १ विभागीय परिषद 'आतिथ्य' नुकतीच गोविंदश्री मंगल कार्यालय सोलापूर येथे एम.जे.एफ.ला. सुनिल सुतार (डिस्ट्रीक्ट गव्हर्नर),एम.जे.एफ.ला. द्वारका जालान (पास्ट मल्टीपल कौन्सिल चेअरमन).एम.जे.एफ.ला. आझम शेख (रिजन चेअरमन),एम.जे.एफ.ला. डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी (माजी प्रांतपाल कॉन्फरन्स चेअरमन). राजशेखर कापसे (प्रथम उपप्रांतपाल)एम.जे.एफ. ला. भोजराज नाईक-निंबाळकर (द्वितीय उपप्रांतपाल)एम.जे.एफ.ला. चंद्रकांत रच्चा (रिजन सेक्रेटरी)एम.जे.एफ. ला.ख्वाजाभाई शेख (कॉन्फरन्स सेक्रेटरी) यांचे उपस्थितीत संपन्न झाली.लायन्स क्लब ऑफ सांगोला मार्गदर्शक माजी प्रांतपाल एम.जे.एफ.ला.प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर (माजी प्रांतपाल ३२३४ ड१) यांनी ( परमनंट प्रोजेक्ट) साठी लायन्स क्लब सांगोला, चॅरीटेबल ट्रस्टला मोफत पाच गुंठे जमीन देऊन एक कोटी रुपयापर्यंतची सुसज्ज इमारत उभा केली आहे.सध्या त्याठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल भाडेतत्त्वावर सुरू आहे.येत्या काळात डायलिसिस युनिट सुरु करण्याचा मानस आहे. तसेच प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांचे वाढदिवसानिमित्त दर वर्षी २३ मे रोजी सन २००५ पासून १००० पेक्षा जास्त लोकांचे रक्तदान होते. व विविध उपक्रमामध्ये गेल्या पाच वर्षात सांगोला तालुक्यातील विविध गावांमध्ये मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात,मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरातून ३००० रुग्णांची डोळे तपासणी व ५०० रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच वर्षं २१-२२ मध्ये लक्ष्मीनगर,घेरडी, आलेगाव,कोळा येथे नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरातून १००० रुग्णांची डोळे तपासणी व २०० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.व कमलापूर येथील सर्व रोगनिदान शिबिरामध्ये ४०९ रूग्णांची मोफत तपासणी केली त्यांना योग्य सल्ला व मोफत औषधे देण्यात आली.याशिवाय लायन्स क्लब ऑफ सांगोलाने सामाजिक, शैक्षणिक,पर्यावरण, आरोग्य व इतर विविध क्षेत्रामध्ये समाजाच्या अभ्युदयासाठी विविध उपक्रमातून मौलिक असे सेवाकार्य केले आहे.या उल्लेखनीय योगदानासाठी व सेवाकार्यासाठी लायन्स क्लब ऑफ सांगोलाचा बेस्ट क्लब ऑफ रिजन गोल्डन अवॉर्ड,बेस्ट ऍक्टिव्हिटी ऑफ द रिजन ब्रॉंझ अवॉर्ड,एप्रिसिएशन सर्टिफिकेट फॉर प्रेसिडेंट,सेक्रेटरी,ट्रेझरर अवॉर्ड देऊन सन्मान झाला आहे. तसेच विभागीय परिषदेमध्ये लायन्स क्लब ऑफ सांगोला अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण यांचा बेस्ट लायन ऑफ द रिजन म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.व विभागीय परिषद मध्ये घेण्यात आलेल्या विभागातील क्लब अध्यक्षांच्या वक्तृत्व स्पर्धेत लायन्स क्लब ऑफ सांगोला अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर खजिनदार ला.काकासो नरूटे यांनी विभागीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.या यशाबद्दल लायन्स क्लब ऑफ सांगोला व पदाधिकारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..
या विभागीय परिषदेसाठी ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर ( माजी प्रांतपाल), ला.प्रा.धनाजी चव्हाण (अध्यक्ष),ला.उन्मेष आटपाडीकर (सचिव),ला.काकासो नरूटे (खजिनदार ),ला.सुनील झपके (प्रथम उपाध्यक्ष), कॅबिनेट ऑफिसर सी.ए.,एम.जे.एफ.ला.उत्तम बनकर, ला.मिलिंद फाळके,ला.नरेंद्र होनराव, सदस्य ला.प्रा.अमर गुळमिरे , ला.अच्युत फुले,ला.विवेक घोंगडे,ला.प्रा.शिवशंकर तटाळे,ला.सुनील भोरे,ला.प्रा.डी.के पाटील,ला.अमोल महिमकर,ला.उमेश नष्टे,ला.प्रा.मिलिंद देशमुख,ला.प्रा.नवनाथ बंडगर मा.इंजि.हरिदास कांबळे,सौ सुमन कांबळे (चेअरमन दूध डेअरी आलेगाव) उपस्थित होते..
लायन्स क्लब ऑफ सांगोला
१) बेस्ट क्लब ऑफ रिजन अवॉर्ड
२)बेस्ट ऍक्टिव्हिटी ऑफ द रिजन अवॉर्ड
३)एप्रिसिएशन सर्टिफिकेट फॉर प्रेसिडेंट,सेक्रेटरी,ट्रेझरर अवॉर्ड
४) बेस्ट लायन ऑफ द रीजन ला.प्रा.धनाजी चव्हाण
५) विभागीय क्लब अध्यक्ष वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक ला. प्रा. धनाजी चव्हाण
६) विभागीय निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक ला. काकासो नरूटे
0 Comments