अनगरच्या शुभम लवळे,गणेश ढवळे यांची एमपीएससी मधून निवड
अधिकाऱ्याचं गाव म्हणून अनगर आकाराला येतय; अनगर विद्यालयात केला सन्मान

अनगर (कटूसत्य वृत्त):- अनगर येथील शुभम दगडू लवळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून वाहतूक निरीक्षक या पदावर निवड झाली तर याच प्रशालेचा माजी विद्यार्थी गणेश बाळू ढवळे (देवडी) यांचीही महाराष्ट्र लोकसेवा आयोग या परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक या पदावर निवड झाली. अनगर हे गाव अधिकाऱ्याचं गाव म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे. या त्यांच्या या यशाबद्दल माजी आमदार राजन पाटील जि प सदस्य बाळराजे पाटील व पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.
त्यांच्या या यशाबद्दल कै शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य चंद्रकांत ढोले यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
खरी गुणवत्ता ही ग्रामीण भागात असून परिस्थिती सामान्य असली तरी त्याच्यावर आपणाला मात करता आली पाहिजे.प्रचंड जिद्द कष्ट आणि मेहनत यांच्या जीवावरती आपण हे यश संपादन केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या या यशामध्ये शाळा, महाविद्यालय आणि शिक्षक यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत या दोघांनीही व्यक्त केले.
याप्रसंगी उपप्राचार्य सिताराम बोराडे, पर्यवेक्षक शिवाजी मोटे, चंद्रकांत यावलकर, महादेव चोपडे,माधव खरात, संजय डोंगरे,संभाजी बोडके, रमेश चव्हाण, संजय निलकंठ, गोरख गायकवाड, डॉ.प्रशांत कुलकर्णी, दाजी गुंड,पांडुरंग शिंदे, विनायक कोल्हाळ, सोमनाथ ढोले, ज्ञानेश्वर वाघमारे, अनुराधा गोडसे, अनुपमा वरवटकर,माधवी पाचपुंड आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सत्यवान दाढे यांनी सूत्रसंचालन केले तर पांडुरंग शिंदे यांनी आभार मानले.
फोटो ओळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून निवड झालेले अनगर प्रशालेचे माजीविद्यार्थी शुभम लवळे व गणेश ढवळे यांचा सत्कार करताना प्राचार्य चंद्रकांत ढोले, उपप्राचार्य सिताराम बोराडे, पर्यवेक्षक शिवाजी मोटे आदि उपस्थित होते.
0 Comments