Hot Posts

6/recent/ticker-posts

कृषिकर्ज फेडणाऱ्याना प्रोत्साहन पर ५० हजार रुपये - उपमुख्यमंत्री अजित पवार

कृषिकर्ज फेडणाऱ्याना प्रोत्साहन पर ५० हजार रुपये -  उपमुख्यमंत्री अजित पवार




मुंबई (कटूसत्य वृत्त):-  राज्यातील शेतकऱ्यांना देणे असणारे कृषिकर्ज फेडणाऱ्या  प्रोत्साहन पर ५० हजार रुपये देण्याची पूर्ती येत्या वर्षात केली जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत  स्पष्ट  केले. २ लाखांवरील कर्जदार शेतकऱ्यांना पुनर्गठन योजना पुढील वर्षात पूर्ण करू असे  पवार म्हणाले. कृषी कर्जमाफी अद्याप देण्यात आली नाही या प्रश्नाला त्यांनी  उत्तर दिले. कर्जमाफी योजनेवर विपरीत परिणाम वारंवार पाठपुरावा करूनही हे प्रोत्साहन पर अनुदान देत नाही असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता, प्रश्नोत्तराच्या तासात शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा प्रश्न सभागृहात उपस्थित झाला होता. २०१९ साली योजना जाहीर होऊन ही अद्याप अनेक जणांना ही माफी मिळालेली नाही असा सदस्यांचा आक्षेप होता. कोरोनाच्या काळात राज्याची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे कर्जमाफी योजनेवर विपरीत परिणाम झाल्याची माहिती आधी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आणि नंतर अजित पवार यांनी ही दिली, मात्र अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असे सहकार मंत्री म्हणाले. ५० हजार प्रोत्साहन रक्कम आणि २ लाखांवरील योजनेबद्दलची नेमकी तारीख सांगा अशी मागणी  विरोधकांची  होती. राज्यात २०२१पासून नवीन कृषी धोरण लागू केल्यानंतर वर्षभरातच १ लाख३४ हजार कृषिपंपाना वीज जोडणी देण्यात आलेल्या आहेत याउलट २०१८ पासूनच्या जुन्या धोरणात १लाख २९ हजार जोडण्या देण्यात आल्या होत्या अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्रसाद तनपुरे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.गडचिरोली जिल्ह्यातील २,७६४ प्रलंबित जोडण्या कृषी आपत्कालीन फंडातून दिल्या जातील असेही तनपुरे म्हणाले. 

Reactions

Post a Comment

0 Comments