आमदार रवी राणा गुन्हा दाखल प्रकरणी गृहमंत्र्याचे चौकशीची मागणी
मुंबई (कटूसत्य वृत्त):- अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी आमदार रवी राणा यांच्या वर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला या विषयावरून सभागृहात जोरदार गदारोळ झाला. रवी राणा यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी हा विषय लावून धरला, राणा यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी झालेल्या प्रकारची चौकशी करू, संपूर्ण माहिती घेऊ असे स्पष्ट करत आलेली माहिती विरोधी पक्षनेत्याला सांगितली जाईल असे सांगितले.विरोधकांची घोषणाबाजी मात्र सरकार कडून आधी कोणतेही ठोस उत्तर न आल्याने विरोधक संतप्त झाले, त्यांनी घोषणाबाजी सुरू केली, त्यांनी आपल्या जागा सोडल्या, गदारोळ झाला ,मात्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत गृह मंत्र्यांनी निवेदन करण्याची मागणी केली. गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी झालेल्या प्रकारची चौकशी करू, संपूर्ण माहिती घेऊ असे स्पष्ट करत आलेली माहिती विरोधी पक्षनेत्याला सांगितली जाईल असे सभागृहात सांगितले. ऊर्जा मंत्र्यांनी निवेदन करण्याची सूचना सोलापूर जिल्ह्यात सूरज जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थगन प्रस्ताव दिला होता , त्याला सुधीर मुनगंटीवार यांनी त्याला पाठिंबा दिला, पिकाला पाणी देण्याच्या वेळेला त्याची वीजजोडणी तोडली त्यामुळे त्याने हे कृत्य केले हा प्रकार गंभीर आहे त्यावर तातडीने चर्चेची मागणी केली. सरकारने कृषी पंपांची वीज जोडणी तोडणे तातडीने बंद करावे अशी मागणी फडणवीस यांनी केली, राष्ट्रवादीच्या यशवंत माने यांनी ही पाठिंबा दिला. मात्र हा प्रस्ताव उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी फेटाळला आणि ऊर्जा मंत्र्यांनी निवेदन करण्याची सूचना केली. बीड मधील कायदा सुव्यवस्था बाबत बैठक दोन कुटुंबातील जमीन विक्रीच्या वादातून बीड जिल्ह्याधिकारी कार्यालयात गोळीबार करण्यात आला त्या दोन्ही बाजूच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बाबत बैठक घेऊ असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत स्पष्ट केले , याबाबतच्या लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे , पोलीस अधीक्षक हप्ते घेत फिरतात , वाळू माफिया बोकाळले आहेत , खुले आम गुंडगिरी सुरू असल्याचे थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकाश सोळंके यांनी यादरम्यान केला , त्याआधी हेच आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत तातडीने कारवाईची मागणी केली होती. महिला आमदार नमिता मुंदडा यांनी आपल्या बाबतही गंभीर प्रकार घडल्याचं सांगितले. नाना पटोले यांनीही कायदा सुव्यवस्थे बाबत प्रश्न उपस्थित केले. वाढलेल्या गुन्हेगारीची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करून १५ दिवसांत अहवाल प्राप्त करून घेऊ असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घोषित केले. पोलिसांनी माफियांवर कडक कारवाई करण्याचीही घोषणा केली.पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी महिला आमदाराबद्दल घडलेल्या घटनेवरून बीड पोलीस अधीक्षकांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी भाजपाच्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्यावर , भाजप सदस्य आक्रमक झाले , घोषणाबाजी सुरू करीत , जागा सोडून पुढे आले.त्यामुळे संबंधित पोलिस निरीक्षकांना तातडीने निलंबित करण्याची घोषणा दिलीप वळसे पाटील यांनी केली , याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल केला जाईल असे ते म्हणाले. नमिता मुंदडा यांच्या घटने बाबत बीड च्या पोलीस अधीक्षकांना तत्काळ रजेवर पाठविण्यात येत असल्याची गृहमंत्र्यांची घोषणा केली. फडणवीस यांनी पुन्हा मुद्दा उपस्थित केला होता.
0 Comments