शेतकऱ्यांची वीज शेतकऱ्यांची तोडण्यावरून विधानसभेत गदारोळ कामकाज दिवसभरासाठी स्थगित
मुंबई (कटूसत्य वृत्त):- चालू बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचे विजपंप जोडणी तोडण्यात येणार नाही असे आश्वासन विधानसभेत हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देऊनही वीज तोडणे सुरूच असल्याने सरकारने भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी विरोधकांनी कामकाज रोखून धरले. विरोधी सदस्य या मुद्यावर आग्रही राहिल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ होऊन आधी दहा मिनिटे आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. पवार यांच्यावर हक्कभंग दाखल करू राज्यातील वीज जोडणी तोडण्यात येत असल्याचा मुद्दा आधी स्थगन प्रस्तावाद्वारे आणि नंतर यावरच्या लक्षवेधी सूचनेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. सभागृहात दिलेली आश्वासने पूर्ण करा अन्यथा अजित पवार यांच्यावर हक्कभंग दाखल करू असा इशारा फडणवीस यांनी दिला. काँग्रेसच्या नाना पटोले , कुणाल पाटील यांनी ही शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती. आधी ऊर्जा राज्यमंत्री प्रसाद तनपुरे आणि नंतर मंत्री डॉ नितीन राऊत वीज मंडळाची स्थिती सांगायचा प्रयत्न करत होते, सध्याचे बिल भरले आणि थकबाकी चे हप्ते सोयीने भरण्याची तयारी असणाऱ्यांची वीज तोडली जात नाही असे ते वारंवार सांगत होते मात्र सध्याच्या बिलातच थकबाकी आणि व्याज वसूल केले जाते आहे असे फडणवीस म्हणाले, ही सरकारकडून फसवणूक होत आहे, यामुळे विरोधक आक्रमक झाले. त्यांनी अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री अथवा मुख्यमंत्री सभागृहात नव्हते, ते येईपर्यंत कामकाज थांबवा अशी विरोधकांची मागणी होती, यात तिसरी लक्षवेधी पुकारण्यात आली. गदारोळ वाढल्यावर आधी दहा मिनिटे कामकाज तहकूब झाले. विधेयके एकमताने चर्चेविना मंजूरपुन्हा कामकाज सुरू होताच निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेण्याची तरतूद असणारी अनुक्रमे नगरविकास आणि ग्रामविकास विभागाची विधेयके मांडण्यात आली. आयोगाने सरकारची चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तरतूद असणारी विधेयके सभागृहात एकमताने चर्चेविना मंजूर करण्यात आली. यानंतर पुन्हा गदारोळ झाला आणि कामकाज अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. गदारोळातच राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शन कामकाज पुन्हा सुरू होताच गदारोळातच राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन करणारा प्रस्ताव चर्चेशिवाय मंजूर झाला, पुरवणी मागण्या वरील आज सादर झालेल्या विभागांच्या मागण्याही मंजूर करण्यात आल्या आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी सभागृहात उपस्थित होते मात्र वीज तोडणी विषयावर त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही.
0 Comments