शहरात उपचार घेणारे माजी सैनिक व कुटुंबीयांना मोफत जेवणाची व्यवस्था
भारतीय माजी सैनिक संघटना व लोकमंगल समूह यांचा पुढाकार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सोलापूर शहरांमध्ये उपचार घेण्याकरता माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय हे येत असतात.शहरात आल्यानंतर विविध चाचण्या करण्यासाठी व त्याचे अहवाल प्राप्त होण्यासाठी वेळ जातो तसेच चाचण्या झाल्या नंतर रुग्णालयात उपचार घेणे करता काही दिवस येथे त्यांना थांबावे लागते.अशा वेळी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना जेवणाची व्यवस्था होत नाही तसेच कोरोना महामारी अद्याप संपलेली नसल्याने हॉटेल्समधील खाणेही अडचणीचे ठरत आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून भारतीय माजी सैनिक संघटना सोलापूर शाखा यांच्या पुढाकाराने व लोकमंगल उद्योग समूह यांच्या सहकार्याने ही योजना चालू केली असल्याचे भारतीय माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अरुणकुमार तळी खेडे यांनी दैनिक कटुसत्यशी बोलताना सांगितले. भारतीय माजी संघटना सोलापूर शाखेतील पदाधिकारी व संचालक मंडळ यांचा एक वर्षाचा कार्यकाल नुकताच पूर्ण झाला असल्याने त्याचे औचित्य साधून ही योजना सुरू केली असल्याचे अरुणकुमार तळीखेडे यांनी सांगितले .लोकमंगलच्या अन्नपूर्णा योजनेतून सदरील योजना राबवली जात असून तीन पोळी, वरण ,भात, भाजी आणि स्विट असा मेनू या डब्यामध्ये असणार आहे. जास्तीत जास्तीत जास्त माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी या योजनेचा लाभ घ्यावा व डब्याची ऑर्डर देण्यासाठी 8208624250 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष अरुणकुमार तळीखेडे यांनी केले आहे. माजी सैनिक हे आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी ऊन ,वारा ,पाऊस याची तमा न बाळगता सदैव तयार होते. आपल्या कुटुंबीयांपासून कोसो मैल दूर राहून त्यांनी आपल्या सर्वांचे रक्षण केले आहे.सैनिकी पेशातून निवृत्त झाल्यानंतर त्यांचा मान सन्मान ठेवणे व त्यांना कोणतीही अडचण येऊ न देणे हे आपले कर्तव्य आहे असे मी मानतो.
(अरुण कुमार ताळीखेडे अध्यक्ष भारतीय माजी सैनिक संघटना सोलापूर शाखा)
भारतीय माजी सैनिक संघटना सोलापूर शाखेची वार्षिक सभा 8 मार्च रोजी दुपारी अकरा वाजता संघटनेच्या कार्यालयात ठेवण्यात आलेली आहे. सर्व सभासदांनी वेळेत सभेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आले आहे.
0 Comments