नवाब मलिकांच्या राजीनामा येईपर्यंत अर्थसंकल्‍पीय अधिवेशन चालू देणार नाही - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 2, 2022

नवाब मलिकांच्या राजीनामा येईपर्यंत अर्थसंकल्‍पीय अधिवेशन चालू देणार नाही

 नवाब मलिकांच्या राजीनामा येईपर्यंत अर्थसंकल्‍पीय अधिवेशन चालू देणार नाही 




 विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा सरकारला इशारा 

मुंबई  (कटूसत्य वृत्त):- मुंबई बॉम्ब स्फोटाचे आरोप आणि दाऊदशी व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना राज्यातील उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार पाठीशी घालत आहे. कोणतीच यंत्रणा येथे सक्षमपणे राबवली जात नाही. भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. संजय राठोड आणि अनिल देशमूख यांचा राजीनामा लगेच मंजूर होतो; पण दाऊदशी व्यवहार करणाऱ्यांना हे सरकार पाठीशी घालत एका विशिष्ट समाजाला गोंजारले जात आहे. असे असले तरी मुंबईकरांच्या मारेकरांना आम्ही सोडणार नाही, मालिकांचा राजीनामा घेत नाही तो पर्यंत आम्ही अर्थसंकल्‍पीय अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांच्या शब्दाला किमंतच राहिलेली नाही. हे सरकार बेवड्यानं समर्पित आहे असा सणसणीत टोलाही त्यांनी आघाडी सरकारला लगावला. आम्हाला अनेक विषय चर्चेत सहभागी व्हाययचे आहे, मात्र सरकारची तयारी हवी असेही ते म्हणाले. राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून मुबई येथे सुरु होत आहे. यानिमित्त आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  राज्यातील सरकारमध्ये अजित पवार यांच्‍या शब्दाला कोणतीही किंमत राहिलेली नाही. सगळा कारभार अनागोंदी आहे. मागील दोन अधिवेशात अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या विजेचे  कनेक्शन कापले जाणार नाही असा शब्द दिला होता. आता तर वीज  कनेक्शन कापण्यासाठी कंत्राटदारांची स्पर्धा सुरू आहे. पिके वाळून, जळून जात आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून शेतकरी हवालदील झाला आहे. त्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष नाही. राज्यात विजेचे सुलतानी संकट सुरू आहे त्याचाही जाब आम्ही विचारणार असल्याचे फडणवीस म्हणाले.  राज्यातील उस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. मागच्या तीन वर्षांत शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आल्याने तो नुकसानीच्या खाईत असताना शेतकऱ्यांची शेतीची वीज तोडली जात आहे.  महात्मा फुले योजनेअंतर्गत अनुदान दिलेले नाही. ओबीसी महाज्योती शिष्यवृत्तीचे पैसे दिले जात नाहीत. शिवाय सरकार मधील ओबीसी नेते महाज्योतीसाठी एक पैसाही मागत नाहीत. ही योजना सरकार बंद करण्याच्या मार्गावर आहे. पेसा आणि सामाजिक न्याय विभागात प्रचंड गैरकारभार सुरु आहे. कारकून साहेबांना लाच मागतो आहे. वाळू, दारू, खंडणी आणि भ्रष्टाचाराची पपरम सीमा या सरकारने गाठली आहे.    

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages