Hot Posts

6/recent/ticker-posts

सभासदांच्या प्रश्नांना उत्तर न देता चेअरमन,संचालक मंडळाने काढला पळ- अभिजित पाटील

 सभासदांच्या प्रश्नांना उत्तर न देता चेअरमन,संचालक मंडळाने काढला पळ- अभिजित पाटील 


पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याची ४५ व ४६ वी वार्षिक सर्वसाधारण प्रतीसभा ऑनलाईन पद्धतीने संत तनपुरे महाराज मठ,पंढरपूर येथे सभासद बांधवाच्या उपस्थित पार पडली.गतवर्षी श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद ठेवल्यामुळे शेतकऱ्यांत तीव्र नाराजी आहे. अकार्यक्षम चेअरमन आणि संचालक मंडळांना यासभेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. ऊस उत्पादक सभासदांचा ऊस गाळपास नेण्यासाठी मोठी हेळसांड झाली. ऊस कोठे घालवायचा? हा मोठा प्रश्न शेतकरी सभासदापुढं होता. त्याची विचारणा केली असता श्रीविठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन आणि संचालक मंडळ हे पळपुटे निघाले! यावेळी विचार विनिमय बैठक घेऊन येणाऱ्या काळात लवकरच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन असा विश्वास अभिजित पाटील यांनी उपस्थित सभासदांना दिला.यावेळी सहकार शिरोमणी,चे संचालक दिनकर चव्हाण,विठ्ठल चे माजी संचालक राजाराम सावंत,हणमंत पाटील,माजी उपसभापती विष्णू बागल,गणेश ननवरे ,अशोक जाधव,शेखर भोसले,धमेंद्र घाडगे,विक्रम कोळेकर,प्रा.तुकाराम मस्के रामचंद्र वाघ,अशोक भोसले,दत्तात्रय नागणे आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments