श्री विठ्ठल कारखान्याची 45 व 46 वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
वेणुनगर, (कटूसत्य वृत्त):- श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याची 45 व 46 वी ऑनलाईन अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज बुधवार दिनांक 30.03.2022 रोजी सकाळी 11.00 वाजता कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन, भगिरथ भारत भालके, यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यासभेत सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मान्यता दिली. सदर सभेसाठी सभासदांनी ऑनलाईन सहभाग घेतला. सुरुवातीस श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पुजन,कारखान्याचे संस्थापक-चेअरमन कर्मवीर कै.औदुंबरआण्णा पाटील, संस्थापक-व्हाईस चेअरमन यशवंतभाऊ पाटील,माजी चेअरमन कै.वसंतदादा काळे, माजी चेअरमन कै.राजाभाऊ औदुंबर पाटील, माजी चेअरमन आमदार कै.भारतनाना भालके यांच्या प्रतिमेचे पुजन जेष्ठ संचालकांचे शुभहस्ते करण्यात आले.सदर सभे’ध्े कारखान्याचे संचालक समाधान काळे यांनी श्रध्दाजंलीचा ठराव मांडला. प्रास्ताविकात बोलताना कारखान्याचे चेअरमन भागिरथ भालके यांनी मागील सन 2020-2021 हंगामाचा आढावा घेतला यामध्ये सन 2020-2021 या गळीत हंगामात 3,03,574 मे.टन ऊसाचे गाळप होऊन 2,67,225 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले तसेच कारखान्याचा 29.8.वॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प चालू असून गळीत हंगा’ 2020-21 मध्ये 2,46,29,000 युनिटस् वीज उत्पादन झाले असून कारखान्याचा इनहाऊस वापर सोडून 1,52,89,500 युनिटस्ची महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीस निर्यात केलेली आहे. डिस्टीलरी प्रकल्पामधून सन 2020-21 हंगामात आर.एस. व इ.एन.ए.चे एकूण 14,20,464 लिटर्स इतके उत्पादन झालेले आहे. सभासदांची राहिलेली एफआरपी र्नक’ तसेच ऊस तोडणी वाहतूकीची बिले, कामगारांची देणी कारखान्याकडे शिल्लक असलेली बँकेच्या तारणातील 1,09,973 साखर पोती विक‘ी करुन लवकरच वरील देणी देत आहोत.कारखान्यामार्फत सभासदांचा अपघात विमा घेतलेला असून विमा प्रिमियमची रक्कम रुपये 32.25 लाख कारखान्याने अहवाल सालामध्ये स्वभांडवलातून भरलेली आहे. दुर्दैवाने ’त झालेल्या सभासदांच वारसांना विम्याची रक्कम रू.5.00 लाख मिळत आहेत. अहवाल सालात 12 सभासदांच्या वारसांना रक्कम रु.60.00 लाख विमा कंपनीकडून कारखान्याने आर्थिक मदत मिळवून दिलेली आहे. यावेळी सभेचे अध्यक्ष श्री भगिरथ भालके यांनी सभासदांनी विचारलेल्या धोरणात्मक प्रश्नांना उत्तरे दिली.वेळी कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक, आर.एस.म्हेत्रे यांनी ऑनलाईन विषय पत्रीकेवरील विषयांचे वाचन केले. ा सर्व विषयांना सभासदांनी ऑनलाईन वरुन मंजूरी दिली.शासनाने सहकारी साखर कारखानंच सभासद भागाचे दर्शनी ’ुलं’ध्े 10 हजारावरुन 15 हजार वाढ करणेबाबत दि. 18 मे 2021 रोजीच्या आदेशानुसार कळविले आहे. त्यानुषंगाने कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी विषय क‘.11 बाबत लेखी पत्र देवून याबाबत कारखान्याच्या सभासदांच्या दर्शनी मुल्यांमध्ये वाढ करणेबाबत आत्ता निर्णय घेणे योग्य होणार नाही. गेली दोन वर्षे शेतकरी सभासद कोरोना महामारी व कारखान्याचा बंद असलेला गाळप हंगाम तसेच थकलेली ऊसबिले या कारणाने आर्थिक अडचणीत आलेत. अशा परिस्थिती भाग भांडवल वाढविणेसाठी घेतलेला हा विषय पुढील वार्षिक सभेपर्यंत पुढे ढकलणेत यावा, अशी त्यांनी लेखी पत्राव्दारे मागणी केली. या सभेचे अध्यक्ष भगिरथ भालके यांनी सदर पत्राची नोंद घेवून सदरचा विषय तुर्त स्थगित ठेवून पुढील वर्षी होणार्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घेणेत येवून भांग भांडवलाची रक्कम भरणेसाठी मुदतवाढ मिळणेसाठी ठराव करुन शासानाकडे प्रस्ताव पाठविणेत येईल, असे त्यांनी सांगीतले.कारखान्याचे सभासद दिनकर आदिनाथ चव्हाण यांनी मांडलेला प्रश्न मिटींगच्या आयत्यावेळच्या विषयामध्ये घेवून सदरच्या विषयास ठरावाव्दारे मान्यता देणेत आली.या सभेसाठी कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मणआबा पवार,संचालक मोहनआण्णा कोळेकर, युवराज पाटील, समाधान काळे, अॅड.दिनकर पाटील, गोकुळ जाधव, दशरथ खळगे, सुर्यकांत बागल,विलास देठे, नेताजी सावंत,उत्तम नाईकनवरे, संतोषकुमार गायकवाड, नारायण जाधव, बाळासाहेब गडदे, महादेव देठे, राजाराम भिंगारे, तज्ञ संचालक धनाजी घाडगे, ए’.एस.सी.बँकेचे प्रतिनिधी सी.एस.पाटील, कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.कारखान्याचे संचालक दशरथ पंढरीनाथ खळगे यांनी सर्व उपस्थित सभासदांचे आभार मानले व सुत्रसंचलन प्राचार्य नागटिळक सर यांनी केले.
0 Comments