माढा आदर्श तालुका म्हणुन नावारूपास येणार- आ.बबनराव शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास,ऑक्सिजन पार्कचे वडाचीवाडीत केले लोकार्पण
माढा (कटूसत्य वृत्त):-मागील ३० वर्षात झालेली प्रगती पाहता आणि तालुक्यात नाविन्य पुर्ण ग्रामीण भागात देखील प्रकल्प उभे राहताहेत.त्यामुळे माढा तालुका यापुढील काळात देखील राज्यात निश्चितच आदर्श तालुका म्हणुन नावारूपास येणार असल्याचा विश्वास आमदार बबनराव शिंदे यांनी व्यक्त केला. माढा तालुक्यातील वडाचीवाडी(अ.उ) गावात पाणी फौंडेशनच्या बक्षिसाच्या रक्कमेतुन सरपंच रमेश भोईटे यांनी साकारलेल्या ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी पार पडले. या ऑक्सिजन पार्क ला आमदार बबनराव शिंदे यांचे नाव देण्यात आले.प्रारंभी आमदार शिंदे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत फित कापुन डिजीटल फलकाचे अनावरण करीत पार्कच लोकार्पण झाले.पर्यावरण संतुलन अबाधित ठेवणारा हा ग्रामीण भागातील ऑक्सिजन पार्क जिल्हातील इतर गावापुढे आदर्श दायी माॅडेल ठरणार असल्याचे सांगत ऑक्सिजन पार्क साठी आगामी काळात लागणाऱ्या निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे नमुद केले.सरपंच रमेश भोईटे यांनी प्रास्ताविकातुन ऑक्सिजन पार्क ची संकल्पना मांडुन कोरोना काळात झालेला ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता.पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा प्रकल्प उभा केल्याचे सांगत आगामी काळात व्यायाम शाळा,मंगल कार्यालय,अभ्यासिका केंद्र पार्क मध्ये उभा करणार असल्याचे सांगितले. तिन एकर च्या क्षेत्रात साकारलेल्या या प्रकल्पाच्या ठिकाणी विविध ९३० वृक्षाची लागवड करुन वृक्ष संवर्धनासाठी ४ कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक शाम बुवा,बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील जामगावकर,मार्तड जगताप आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळीपंचायत समिती सदस्य धनराज शिंदे, उपसभापती सुहास पाटील जामगावकर,सहायक पोलीस निरीक्षक शाम बुवा,बाजार समितीचे संचालक हनुमंत पाडुळे,अनिल देशमुख,संदीप पाटील,सुमित घालमे,ग्रामसेवक संजय क्षीरसागर, उल्हास राऊत,गणेश काशिद,विलास कौलगे,रमेश उमाटे,शानु सय्यद,रामहरी आदलिंगे,रमेश पाडुळे,मार्तंड जगताप,आप्पा पवार,गौरव पाडुळे, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. घाबरु नका;मार्च एन्ड पर्यत ऊस राहणार नाही-दरवर्षी कारखान्याची ऊसाची सरासरी ९० टनाची हेक्टरी असते.या वर्षी पाऊस चांगला झाला.हेक्टरी १२० टन यंदा झाला.म्हणजे यंदा प्रति हेक्टर ३० टनाने वाढले.तालुक्यातील सगळे कारखाने फुल चालतेत.ऊसाचे टनेज वाढले आहे.शेतकर्यानी घाबरुन जायचं काय कारण नाही.मार्च एन्ड पर्यत कोणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही.असे देखील आमदार बबनराव शिंदे यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले
0 Comments