मोहोळ मतदार संघातील प्रमुख रस्त्याच्या निधीसाठी आमदार यशवंत माने यांनी घेतली ना.नितीन गडकरी यांची भेट
मोहोळ ( कटूसत्य वृत्त) :- मोहोळ विधानसभा मतदारसंघातून चार राष्ट्रीय महामार्ग आणि अनेक राज्य महामार्गाचे जाळे आहे. मतदारसंघातील विविध राज्य आणि जिल्हा मार्गांच्या मजबुतीकरणासाठी आणि डांबरीकरणासाठी ५० कोटीच्या भरीव निधीची मागणी आमदार यशवंत माने यांनी दिल्ली येथे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. या मागणीला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद केंद्रीय दळणवळण मंत्री गडकरी यांनी दिला असून याशिवाय येत्या काळात अन्य राज्य आणि जिल्हा मार्गांसाठी देखील निधीची तरतूद करण्याचे ठोस आश्वासन गडकरी यांनी दिले आहे. अशी माहिती आमदार माने यांना दिली आहे. या भेटीवेळी सर्व मार्गांच्या मजबुतीकरणासाठी आणि रुंदीकरणासाठी केंद्र स्तरावरून निधी मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे विकास मार्गदर्शक शरदचंद्र पवार,उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार,मोहोळ मतदार संघाचे मार्गदर्शक राजन पाटील, जेष्ठनेते बळीराम काका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील रस्त्यांना निधी मिळावा यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. रस्त्याची समस्या ही सर्वात मोठी समस्या असते. केंद्र आणि राज्य स्तरावरून भरीव निधी मिळाल्यास यापुढील काळात मोहोळ मतदारसंघातील एकही मार्ग निधी वाचून वंचित राहणार नाही असा मला विश्वास वाटतो. असे ही यावेळ आमदार यशवंत माने म्हणाले. यापूर्वी देखील गत वर्षी आमदार माने यांनी ना .गडकरी यांना भेटून मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गाच्या विविध समस्या बाबत चर्चा केली होती. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहरातील भुयारी मार्ग त्याचबरोबर सर्विस रस्ते यासाठीच्या निधीला मंजुरी गडकरी यांनी दिली होती. काल झालेल्या भेटीमुळे आणि आमदार यशवंत माने यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्र आणि राज्य स्तरावरून मोहोळ मतदारसंघातील अनेक प्रमुख मार्गांना यापुढील काळात निधी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यावेळी आमदार माने यांच्या समवेत संतोष वाबळे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या मार्गासाठी केली ५० कोटी निधीची मागणी राज्य आणि जिल्हा मार्गांमध्ये बार्शी मालवंडी मानेगाव नरखेड भोयरे या मार्गावरील नरखेड जवळील भोगावती नदीवरील पुलासाठी वीस कोटी रुपयांच्या निधीची मागणी तर पाटकुल- आढेगाव - सौंदणे -सय्यद वरवडे -विरवडे बुद्रुक या राज्य मार्गासाठी पंधरा कोटी रुपयांच्या निधीची मागणी तर मोहोळ - तांबोळे - सौंदणे - वरकुटे - औंढी - वडदेगाव घोडेश्वर म्हणजे बेगमपूर या मार्गासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीची मागणी आमदार यशवंत माने यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री ना. नितिन गडकरी यांच्याकडे केली आहे. शासन स्तरावर पाठपुरावा करून मोहोळ मतदारसंघातील चारही दिशेच्या प्रमुख मार्गांसाठी आणि गावे जोडणाऱ्या रस्त्यांसाठी जिल्ह्यात सर्वाधिक निधी मंजूर करण्याचा प्रयत्न करणार. मतदारसंघातील गावातील प्रमुख समस्या म्हणजे रस्ते हिच आहे. या भागातील सर्वच रस्ते अद्यावत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यशवंत माने आमदार मोहोळ विधानसभा मतदार संघ
0 Comments