सांगोला उपसभापती नारायण जगताप यांच्या गावातील प्रकार -'तेरी भी चूप मेरी भी चूप"च्या अवस्थेत.
प्रशासनाचा कानाडोळा, ग्रामसेवकाचा वेगळाच तोरा.सीईओ साहेब चौकशी करून कारवाई करणार का ?
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आधी पाईप लाईन मग टेंडर प्रसिद्ध करून ग्रामपंचायतीची रक्कम हडप करण्यासाठी आसुलेला ग्रामसेवक मात्र आपण काहीच केले नसल्याच्या अविर्भावात आहे.संबंधित प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे.उपसभापती नारायण जगताप आपल्याच पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, त्यामुळे आपले कोणीच काही करत नसल्याचा आव ग्रामसेवकाला आला असल्याचा आरोप काही नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. ओबीसी महिला सरपंचास डावलून स्वतःच गांवचे कारभारी बनत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी मांजरी ता सांगोला येथे घडला आहे.विद्यमान उपसभापती नारायण जगताप यांच्या गावातच हा प्रकार घडल्याने सर्वसामान्य मात्र हवालदिल झाले आहेत. याबाबतीत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे
मांजरी ग्रामपंचायतीने गावठाण, गांव वाड्या वस्तीवर पाईप लाईन करणेसाठी 15 व्या वित्त आयोगातून 9 लाख15 हजार नऊशे अठ्ठयाऐशी रुपयाचे ई निविदा ( टेंडर ) दिनांक 14 जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या होत्या.निविदा भरण्याचा दिनांक 19 जानेवारी 2022 पर्यत असतानाच गावच्या ग्रामसेवकाने टेंडर मुदत संपण्या अगोदरच काम पूर्ण करून मी किती कामसू आहे हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे.याला खतपाणी स्वतः उपसभापती आणि उपसभापती पुत्र करत असल्याचा आरोप गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
तर मांजरी गावचे ग्रामसेवक कालीदास खताळ यांना स्वतःलाच काम करायचे होते, तर त्यांनी ई निविदा प्रसिध्द केल्याच कशासाठी? असा प्रश्न जनतेतून चर्चिला जात आहे. गेली 30 वर्षे गाव पाण्यासाठी संघर्ष करीत असून या कालावधी मध्ये या गावाला अनेक पुरुष सरपंच होऊन गेले,परंतु एकदाही सरपंचास गांवचा पाण्याचा प्रश्र मिटविण्याचा ध्यानी मनी आलेले नाही.महिला सरपंचानीच गावचा पाण्याचा प्रश्र कायमचा मिटविण्याचा विषय घेताच श्रेय वादामुळेच गावच्या करभाऱ्याने ओबीसी महिला सरपंचास डावलून स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्यासाठी टेंडर मुदत संपण्या अगोदरच काम पूर्ण केल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात ग्रामसेवक खताळ यांच्याशी 9359152920 वर संपर्क साधला असता,त्यांचा संपर्क होवू शकला नाही.
गावकारभारातील कामातील पारदर्शकता जपणारे जि प मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी या भ्रष्ट कामाची चौकशी करून ग्रामसेवकावर कारवाई करणार का,हे पहावे लागणार आहे. ग्रामसेवकानी गावातील मोजक्या पुढाऱ्यांना हाताशी धरून केलेल्या कामाची सीईओ साहेबांनी निःपक्षपातीपणे चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
0 Comments