गावकऱ्यांच्या व शिक्षकांच्या प्रयत्नातून रोपळे खुर्द शाळा तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात तृतीय
माढा (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या स्वच्छ शाळा,सुंदर शाळा या स्पर्धेत बहुशिक्षकी गटात रोपळे खुर्द जि प.प्राथमिक शाळेने माढा तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात ३रा क्रमांक पटकावला आहे. या सन्मानाचे वितरण मुख्याध्यापक श्रीकांत काशिद यांना प्रातिनिधिक स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार,पालकमंत्री दत्तात्रय भरणे तर ऑफलाईन पद्धतीने जि प अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे,उपाध्यक्ष दिलीप चव्हाण,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते,शिक्षणाधिकारी किरण लोहार आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रोपळे खुर्द शाळा स्वच्छ व सुंदर करण्यासाठी गावातील सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सर्व ग्रामस्थ,विद्यार्थी, पालक,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, ग्रामसेवक, तलाठी,कृषी सहायक, असे सर्व एकवटले होते.शाळेने सुंदर व आकर्षक रंगकाम,पेव्हर ब्लॉक,आर ओ सिस्टीम, संगणक,टॅब,सोलर सिस्टीम, परसबाग, लोकसहभाग,शैक्षणिक सजावट,इ. असे सर्व निकष पूर्ण करत सी .सी .टी .व्ही.यंत्रणा ही कार्यान्वित करण्यात आली आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटक एकत्रित येऊन काम करत आहेत. या यशाबद्दल शाळेतील शिक्षक विठोबा गाडेकर,मुख्याध्यापक श्रीकांत काशिद,शुभांगी गवळी यांचे तसेच विद्यार्थी, ग्रामस्थ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैभव साळुंखे यांचे अभिनंदन केले जात आहे. सभापती विक्रमदादा शिंदे,उपसभापती धनाजी जवळगे,गटविकास अधिकारी संताजी पाटील,गटशिक्षणाधिकारी मारुती फडके,विस्तार अधिकारी बंडू शिंदे ,केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी शाळेस व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत
0 Comments