सांगोला नगरपरिषदे मार्फत "लेखणी बंद" आंदोलन
अमरावती महानगरपालिका आयुक्त श्री.प्रवीण आष्टीकर यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध
सांगोला (कटूसत्य वृत्त):-अमरावती महानगरपालिका आयुक्त श्री.प्रवीण आष्टीकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या दिनांक 10/02/2022 रोजी सांगोला नगरपरिषदे मार्फत लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली. शहरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पाणीपुरवठा,आरोग्य,अग्निशमन आणि विद्युत विभाग ही अत्यावश्यक गटात मोडणारी कामे सुरू राहतील.परंतु ही कामे वगळता इतर कुठल्याही प्रकारचे कार्यालयीन कामकाज होणार नाही. शासकीय अधिकाऱ्यांवर होणाऱ्या अश्या प्रकारच्या भ्याड हल्ल्याचा समाजातील सर्व स्तरातून जाहीर निषेध नोंदविणे गरजेचे आहे.त्यामुळे सांगोला नगरपरिषदे मार्फत पुकारण्यात आलेल्या लेखणी बंद आंदोलनास नागरिकांनी सहकार्य करून अश्या विकृत प्रवृत्ती विरोधात आपला जाहीर निषेध नोंदवावा असे आवाहन यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले.
0 Comments