शहरातील ८८९ सार्वजनिक नळबंद होणार- आयुक्त

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील सार्वजनिक नळांबाबत नगरसेवक सुरेश पाटील यांनी लक्षवेधी उपस्थित केली. त्याला मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी उत्तर दिले. शहरात ८८९ सार्वजनिक नळ असून, ते बंद करण्याबाबत झोन अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. शिवाय काही ठिकाणी सार्वजनिक नळाची पाणीपट्टी कोण देण्यास तयार असेल त्या ठिकाणी नळ बंद करू नये, अशा सूचनाही केल्याचे आयुक्तांनी सभागृहात सांगितले. सार्वजनिक नळासह शहरातील पाणीपुरवठा, खड्डेमय रस्ते, बंद दिवाबत्ती, पुणे रोडवरील फूड प्लाझा याविषयावर महापालिका सभागृहात चर्चा झाली. नोव्हेंबर महिन्यातील तहकूब सभा शनिवारी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी बोलावली होती. सभेच्या सुरुवातीलाच शहरातील सार्वजनिक नळ बंद करण्याबाबत आयुक्तांनी आदेश दिले का? अशी लक्षवेधी नगरसेवक पाटील यांनी मांडली. गरज नसलेल्या ठिकाणचे नळ बंद करण्यात येतील. कारण त्या नळावरून पाणी वाया जात असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे, असे उत्तर देण्यात आले. त्यावर शहरात बोगस नळ अाहेत ते बंद करा, सार्वजनिक नळ बंद करू नका. अन्यथा आंदोलन करू, असे पाटील म्हणाले. पुणे नाका येथे फूड प्लाझा पुणे नाका येथील महापालिकेच्या जागेत फूड प्लाझा बांधण्यात येणार आहे. त्या कामास मान्यता देण्यात आली. फूड प्लाझामध्ये तळघरात दुकाने, दुसऱ्या मजल्यावर फूड प्लाझा तर त्यावर राहण्याची सुविधा आहे. यासाठी इच्छुकांकडून अनामत रक्कम घेण्यात येणार आहे. ती परत दिली जाणार नाही. याचठिकाणी पेट्रोल पंपासाठी भारत पेट्रोलियम कंपनीस जागा देण्यात येणार आहे. त्या कंपनीकडून त्या भागातील स्मशानभूमी सुधारणा करून घ्यावी, अशी मागणी नगरसेवक चंदनशिवे, पुजारी यांनी केली. दर जास्त असल्याचे विरोधी पक्षनेते शिंदे म्हणाले. नोव्हेंबर महिन्यातील तहकूब सभा शनिवारी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी बोलावली होती. सभेच्या सुरुवातीलाच शहरातील सार्वजनिक नळ बंद करण्याबाबत आयुक्तांनी आदेश दिले का? अशी लक्षवेधी नगरसेवक पाटील यांनी मांडली. गरज नसलेल्या ठिकाणचे नळ बंद करण्यात येतील. कारण त्या नळावरून पाणी वाया जात असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे, असे उत्तर देण्यात आले. त्यावर शहरात बोगस नळ अाहेत ते बंद करा, सार्वजनिक नळ बंद करू नका. अन्यथा आंदोलन करू, असे पाटील म्हणाले. डी मार्ट ते आसरा चौक रस्ता दुरुस्ती केली नाही, असा प्रश्न नगरसेविका संगीता जाधव यांनी उपस्थित केला. रस्ते दुरुस्त करण्याचा अधिकार झोन कार्यालयास दिल्याची माहिती नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली. शहरातील दिवे बंद आहेत ते सुरू कधी करणारॽ असा प्रश्न नगरसेविका वहिदाबी शेख यांनी उपस्थित केला. पुढील आठवड्यात दिवे बसवण्यात येतील, त्यासाठी आवश्यक असलेले साहित्य आल्याचे उपअभियंता राजेश परदेशी यांनी सांगितले. खासदार ओवेसी यांच्यावरील हल्ल्याचा नगरसेवक खरादी यांनी सभागृहात निषेध नोंदवला. नगरसेवक सुरेश पाटील यांच्या लक्षवेधीवर सभागृहात माहिती याठिकाणी होणार विकासकामे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्तीतून जांबवीर, उज्ज्वला, किरण, गुरदत्त सोसायटी, नरसिंग झोपडपट्टी, भगवान नगर, तायम्मा मंदिर, सोरेगाव परिसर, अशोक , यशवंत सोसायटी, नालंदानगर, सुशीलनगर, पडगाजीनगर, भोई गल्ली, ढोर गल्ली, सिध्दार्थनगर, गरिबी हटाव झोपडपट्टी, सेंटलमेंट, जुना कारंबा नाका, पांढरे वस्ती, सदिच्छा नगरात विकासकामे करण्यास मान्यता देण्यात आली. दलितमित्र कै. भीमराव जाधव गुरुजी, कै. परशुराम जाधव, कै. भगवानराव गायकवाड यांच्या नावाने प्रवेशध्दार तयार करून नामकरण करण्यास मान्यता देण्यात आली.
0 Comments