Hot Posts

6/recent/ticker-posts

कवठेमहांकाळ नगरपंचायतीत एकहाती सत्ता मिळविल्या बद्दल रोहित पाटील यांचा यशराजेंच्या हस्ते सत्कार

 कवठेमहांकाळ नगरपंचायतीत एकहाती सत्ता मिळविल्या बद्दल रोहित पाटील यांचा यशराजेंच्या हस्ते सत्कार

सांगोला (कटूसत्य वृत्त):- केवळ सांगली जिल्ह्याचे नव्हे तर, संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत अनेक दिग्गज एका बाजूला असूनही अवघ्या २३ वर्षांच्या रोहित पाटील यांनी आपले वर्चस्व आणि राजकीय परिपक्वता सिद्ध करत नगरपंचायतीवर एकहाती सत्ता राखली. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र रोहित पाटील यांच्या नेतृत्वाचे कौतुक होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आणि रोहित पाटील यांचे जिवलग मित्र यशराजे साळुंखे-पाटील यांनी अंजनी ता. तासगाव येथील निवासस्थानी जाऊन रोहित पाटील यांचा सत्कार केला. कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीची संपूर्ण राज्यभर चर्चा रंगली होती महा विकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते एका बाजूला तर अवघ्या २३ वर्षांच्या रोहित पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. प्रदेशाध्यक्ष तथा मा. गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या प्रमाणेच आपल्या नेतृत्वगुणांचा कस दाखवत रोहित पाटील यांनी अत्यंत शांत व संयमी राहुल नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राखण्यात यश मिळवले या निवडणुकीनंतर राज्यभर रोहित पाटील यांचे नेतृत्व गुणाची चर्चा व कौतुक झाले अनेक दिग्गज नेत्यांनी या विजयाबद्दल रोहित पाटील यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीचे युवा नेते आणि अनेक वर्षापासून रोहित पाटील यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असलेले यशराजे साळुंखे-पाटील यांनीही अंजनी येथे जाऊन कवठेमहांकाळ येथील अद्वितीय यशाबद्दल रोहित पाटील यांचा सन्मान केला. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे सभापती अनिल मोटे, योगेश खटकाळे, चंद्रकांत कारंडे, संतोष पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमोल सुरवसे, अनिकेत सुरवसे, रवी चौगुले, गिरीश पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, प्रशांत साळुंखे, दीपक शिंदे, सचिन काकेकर, ऋषी शिंदे, निशांत जाधव, शोएब इनामदार आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments