पंढरपूर क्लबतर्फे सांगोल्यातील उत्कृष्ट सायकलस्वरांचा सत्कार

20000 किमीचा उत्कृष्ट सायकलपटू पुरस्कार सन्मान
सांगोला (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर सायकलर्स क्लबच्यावतीने सांगोल्यातील उत्कृष्ट सायकलपटूचा सत्कार करण्यात आला. सदरचा सत्कार समारंभ सांगोल्यातील जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांच्या संपर्क कार्यालयात उत्साहात पार पडला .सांगोला सायकलर्स क्लबचे नीलकंठ शिंदे सर यांनी अत्यंत कमी कालावधीत दीड वर्षात विक्रमि 20000किमी सायकलिंग पूर्ण केल्याबद्दल तसेच नुकतीच त्यांनी 3 दिवसात देहू ,आळंदी, थेऊर, तळेगाव, पुणे व परतीचा सांगोलापर्यंत 596 कि. मी असा वैशिष्टपूर्ण प्रवास 3 दिवसात सायकलवर पूर्ण केल्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र ,शाल ,हार ,श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला .त्याचबरोबर प्रा.डा प्रकाश बनसोडे ,शैलेश चांडोले यांनीहि 2020-2021 या वर्षात उत्कृष्ट सायकलिंग केल्याबद्दल त्यांनाही उत्कृष्ट सायकलिस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, सदरचा सत्कार जि. प. सदस्य अतुल पवार व पंढरपूर सायकलर्स क्लबचे महेश भोसले ,संतोष कवडे व इतर प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यांनी सायकलिंगची चळवळ सांगोल्यात अखंड ठेवण्याचे आव्हान केले. त्याचबरोबर या सायकलिंग उपक्रमाचे कौतुक करून अभिनंदन केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश चांडोले यांनी केले या कार्यक्रमास शहर व परिसरातील सायकलिस्ट उपस्थित होते.
0 Comments