ड्रोनद्वारे गावठाण मोजणी कामाचा आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते मांजरी येथून शुभारंभ
सांगोला (कटूसत्य वृत्त):- केंद्र शासनाच्या 'स्वामित्व' योजनेअंतर्गत गावठाण जमावबंदी प्रकल्प सर्वे ऑफ इंडिया, ग्राम विकास विभाग आणि भूमिअभिलेख विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला तालुक्यात राबविण्यात येत असून या योजनेमध्ये सांगोला तालुक्यातील ४८ गावांचा समावेश झाला आहे या योजनेचा शुभारंभ मांजरी येथे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते काल गुरुवारी करण्यात आला. गावठाण जमावबंदी प्रकल्पामुळे या ४८ गावांमध्ये नगर भूमापन योजना लागू होऊन गावठाणाचा आणि प्रत्येक खाजगी, सरकारी व ग्रामपंचायत मालकीच्या मिळकती यांना नगरभूमापन (सिटीसर्वे) क्रमांक देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक मिळकतीचे अचूक क्षेत्र व नकाशा तयार होणार आहे जेणेकरून ग्रामस्थ, ग्रामपंचायत व शासन या सर्वांचा फायदा होणार आहे या कामाचे सर्वेक्षण ड्रोन सारख्या अद्यावत यंत्राने होणार असल्याने सर्व मोजणी अचूक होणार आहे. यासाठी सर्व नागरिकांनी मोजणीला सहकार्य करावे असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.
या कार्यक्रमासाठी तहसीलदार अभिजीत पाटील, गटविकास अधिकारी आनंद लोकरे व अधीक्षक भूमीअभिलेख रेश्मा तांबारे, शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, माजी नगराध्यक्ष रफिक भाई नदाफ, माजी सरपंच अभिजीत नलावडे, जगदीश पाटील, दादासाहेब जगताप, सज्जन जगताप, मांजरीच्या सरपंच शहनाज तांबोळी, यांच्यासह मांजरी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments