Hot Posts

6/recent/ticker-posts

लोटेवाडी, आचकदाणी व चिंचोली येथील ग्रामस्थांच्या वतीने कॉंग्रेसचे नुतन जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांचा सत्कार संपन्न

 लोटेवाडी, आचकदाणी व चिंचोली येथील ग्रामस्थांच्या वतीने कॉंग्रेसचे नुतन जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांचा सत्कार संपन्न



सांगोला (कटूसत्य वृत्त):- काँग्रेसचे नेते रविंद्र कांबळे यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड केली आहे. लोटेवाडी आचकदाणी व चिंचोली येथील नागरिकांच्या वतीने  नुतन जिल्हा उपाध्यक्ष रविन्द्र कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य दादासाहेब लवटे, अचकदाणीचे सरपंच विजय पाटील, महाराष्ट्र राज्य भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय बनसोडे , वेट बिगार दक्षता समिती सदस्य बाबासाहेब आईवळे, उद्योगपती अनिल बेहरे ,दस्त लेखनिक व प्रगतशील बागातदार दादासाहेब जाधव, पत्रकार पांडुरंग पाटील, चिंचोली येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश सूर्यागन ,अजित  सूर्यागण, राजेश सूर्यागण,  दीपक मागाडे ,संपादक सोलापूर न्यूज चैनल चे रोहित सूर्यागण. यासह अचकदाणि लोटेवाडी व चिंचोली येथील ग्रामस्थ  यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.


Reactions

Post a Comment

0 Comments