Hot Posts

6/recent/ticker-posts

रविंद्र कांबळे यांची कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गायगव्हाण ग्रामस्थांच्यावतीने सत्कार संपन्न...

रविंद्र कांबळे यांची कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गायगव्हाण ग्रामस्थांच्यावतीने  सत्कार संपन्न...




सांगोला(कटूसत्य वृत्त):- भारतीय काँग्रेस पार्टीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी रविंद्र कांबळे यांची निवड झाल्याबद्दल मौजे गायगव्हाण येथील ग्रामस्थांच्यावतीने सरपंच बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी गायगव्हाण गावातील प्रतिष्ठित नागरिक तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविंद्र कांबळे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. सन 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या माढा मतदार संघातून स्वर्गीय माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील  यांनी निवडणूक लढवली होती . तेव्हा रविंद्र कांबळे यांनी माढा लोकसभा  मतदार संघामध्ये प्रचाराची धुरा यशस्वीपणे पार पाडली होती. आपल्या प्रभावी वक्तृत्वामुळे  वेगळी ओळख निर्माण करण्यामध्ये ते यशस्वी झाले होते. गेले अनेक वर्षापासून 'जनसेवा संघटनेच्या ' माध्यमातून जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बरोबर प्रामाणिकपणे काम केले आहे डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली यांनीही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून काँग्रेस पक्ष वाढीसाठी चांगले काम केले आहे. या सर्व गोष्टीची दखल घेऊन जिल्हाध्यक्षांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नव्याने जाहीर केलेल्या कार्यकारणी मध्ये जिल्हा उपाध्यक्ष पदाची धुरा रविंद्र कांबळे यांचा खांद्यावरती दिली आहे. त्यामुळे गायगव्हाण येथील ग्रामस्थांनी व युवा कार्यकर्त्यांनी रविंद्र कांबळे यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस दिल्या.  त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीणचे भूषण बागल यांचाही सत्कार करण्यात आला. "माझी निवड झाल्याबद्दल आपण सर्वांनी ग्रामस्थांच्यावतीने माझा सत्कार केल्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. तसेच काँग्रेस पक्ष हा  सर्व समाजघटकांना सोबत घेऊन  काम करणारा पक्ष आहे. काँग्रेसची विचारधारा ही सर्वसामान्य माणसांच्या प्रगतीचे चक्र आहे. सामान्य माणसाला व कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्ष करीत आहे. काँग्रेस पक्षात येणाऱ्या सर्व लोकांचे व कार्यकर्त्यांचे  पक्षांमध्ये स्वागतच केले जाईल व त्यांना योग्य तो मानसन्मान दिला जाईल. देशाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना(भाऊ) पटोले, आमदार प्रणिती ताई शिंदे ,सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे मत नुतन जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी व्यक्त केले."  यावेळी सरपंच बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रगतशील बागातदार अमोल कांबळे,  संजय वाघमारे, इंजिनीयर संतोष कांबळे, दत्तात्रेय रजपूत,देवानंद कांबळे, बिभीषण बागल ,अमोल पाटील, महेंद्र कांबळे, सोमनाथ देवकते, प्रथमेश कांबळे, नामदेव वाघमारे, दीपक चव्हाण ,अजित सूर्यगन, लक्ष्मण देवकते, सतीश कांबळे, सौरभ शिंदे , सुनील गायकवाड , दगडू चौगुले, सुरेश देवकते ,राजू चव्हाण ,शंकर साठे, बालाजी वाघमारे, दगडू घाडगे इत्यादी नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन प्रवीण सावंत यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments