तालुक्यातील घरोघरी राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार पोहोचविणार : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या बुधवारी मुलाखती
सांगोला (कटूसत्य वृत्त):-सांगोला तालुक्यातील गावोगावी आणि घरोघरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि शरदचंद्रजी पवार यांचा विचार पोहोचवून आगामी काळात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीला सांगोला तालुक्यातील सर्वात प्रबळ राजकीय पक्ष बनविणार असल्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. शनिवार दि 12 रोजी राष्ट्रवादी भवन येथे युवक कार्यकर्त्यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, श्रीरंग बाबर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अनिल खटकाळे, जिल्हा परिषदेचे सभापती अनिल मोटे, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, माजी नगरसेवक सचिन लोखंडे, जुबेर मुजावर विजय केदार,अजित गोडसे, शरद बाबर, कुमार ढोले, सुनील बाबर, अभिजित बाबर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुयश बिनवडे, सचिन काकेकर, तालुका अध्यक्ष अमोल सुरवसे, कार्याध्यक्ष निशांत जाधव, निखिल जरे शहराध्यक्ष शोएब इनामदार, ऋषी शिंदे आदींसह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारणीचा विस्तार कार्यक्रम पक्षाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या बुधवार दि 16 फेब्रुवारी रोजी दिवसभर सांगोला येथील राष्ट्रवादी भवन या कार्यालयात मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार व प्रसारासाठी तरुणांनी पुढे येऊन आपल्यातील नेतृत्व गुण सिद्ध करून दाखवावे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी वशिला किंवा शिफारस नसली तरीही ज्यांच्यात नेतृत्व गुण आहेत त्यांना आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या वतीने लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाईल असेही यावेळी दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना घेरडी जिल्हा परिषद गटातून वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी अनिल मोटे सारख्या तरुणाला संधी देऊन जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती केले असल्याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सुरुवातीला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेस व आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीचा विस्तार करून मेगा कार्यकारणी जाहीर करण्याची तयारी सुरू असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद तालुक्यात मजबूत होऊ लागली आहे.
0 Comments