जगामधील अंधत्व निवारणासाठी लायन्सचे मौलिक कार्य -माजी प्रांतपाल प्रबुद्धचंद्र झपके
आलेगाव येथे लायन्स क्लब व गुणाई,सुमन हरी डेअरी तर्फे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर
सांगोला (कटूसत्य वृत्त):- आंतरराष्ट्रीय लायन्स संघटनेच्या माध्यमातून जगामधील चौतीस कोटी लोकांना दृष्टी देण्याचे कार्य झाले आहे. अजूनही तेवढ्याच लोकांना उपचारांची गरज आहे त्यामुळे यापुढेही दृष्टिहीनाना दृष्टी देण्याचे अविरत कार्य चालूच राहणार आहे. लायन्स क्लबच्या साईट फस्ट या मोहिमेतून दृष्टिहीनांना दृष्टी देणे तसेच डोळ्यांची काळजी घेणे या संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते.आजही ग्रामीण भागातील बहुतांश व्यक्तींना दृष्टी कमी झाल्याचे जाणवते परंतु उपचाराविना दृष्टीदोष तसाच राहतो. त्याचे मोतीबिंदूत रुपांतर होते अशा वेळी वेळेत उपचार होण्याची गरज आहे. मोतिबिंदू वेळेत ओळखणे आणि वेळेत शस्त्रक्रिया होणे ही महत्वाची बाब आहे हा विचार प्रमाण मानून लायन्स क्लबच्या माध्यमातून आजही गावोगावी मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून प्रत्यक्ष गावातील उपचाराची गरज आहे अशा रुग्णांकडे जाऊन त्यांना उपचार केला जातो हे लायन्स क्लबचे कार्य जगातील अंधत्व कमी करण्याच्या दृष्टीने खूप मौलिक आहे असे प्रतिपादन माजी प्रांतपाल प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले.आलेगाव ता.सांगोला येथे कै.बापूसाहेब झपके जन्मशताब्दी वर्ष २०२१-२२ निमित्त व इंजि. हरिदास कांबळे (समाजसेवक) यांचे वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोला, गुणांई,सुमन हरी डेअरी आलेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व श्रीमंत विजयसिंह पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगली यांच्या सहकार्याने आयोजित मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा.यशराजे दीपकआबा साळुंखे-पाटील(युवा नेते),नंदाबाई दिवसे (सरपंच,आलेगाव),राहुल ढोले (उपसरपंचआलेगाव), श्रीरंग बाबर (माजी सरपंच,आलेगाव),बापू सखाराम कांबळे (गुरूजी )ज्ञानेश्वर बाबर (ग्रा.पं.सदस्य) दामोदर साळे,छाया साळे इंजि.हरिदास कांबळे (समाजसेवक), सुमन कांबळे (चेअरमन गुनाई,सुमनहरी डेअरी)लायन्स क्लब ऑफ अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण उपस्थित होते..शिबिराची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज, कै.बापूसाहेब झपके ,कै.अंबाजी,कै.गणाई कांबळे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.मान्यवरांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे उद्घाटन झाले.
पुढे बोलताना प्रा. झपके म्हणाले इंजि.हरिदास कांबळे व सौ सुमन कांबळे यांनी वाढदिवसाचं औचित्य साधून समाज उपयोगी उपक्रम हाती घेतला ही कौतुकाची बाब आहे. वाढदिवसानिमित्त आपल्या गावातील लोकांच्या आरोग्याविषयी सजग राहून अशा पद्धतीचे शिबिर घेणे हे अमोघ असे कार्य आहे.असे सांगत वाढदिवसानिमित्त व सामाजिक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
सदर शिबिरामध्ये दिवसभरात १३० लोकांची डोळे तपासणी झाली त्यापैकी ११ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी सांगली आय हॉस्पिटलकडे रवाना झाले.तर २५ रुग्णांना चष्मे देण्यात येणार आहेत. या वेळी गुणाई,सुमन हरी डेअरीचे सर्व पदाधिकारी,आलेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध पदाधिकारी,ग्रामस्थ,लायन्स क्लबचे प्रथम उपाध्यक्ष ला. सुनील झपके, सचिव ला.उन्मेश आटपाडीकर, खजिनदार ला. काकासो नरूटे, लायन्स क्लब ऑफ सांगोला उपस्थित सदस्य, आलेगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक लायन्स क्लब सांगोला सचिव ला.उन्मेश आटपाडीकर यांनी केले. सूत्रसंचालन ला.प्रसाद खडतरे यांनी केले.तर नवघरे गुरुजी यांनी आभार प्रदर्शन केले..
0 Comments