Hot Posts

6/recent/ticker-posts

मांजरी ग्रामस्थांच्या वतीने नुतन जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांचा सत्कार संपन्न

 मांजरी ग्रामस्थांच्या वतीने नुतन जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांचा सत्कार संपन्न




सांगोला (कटूसत्य वृत्त):- काँग्रेसचे नेते रविंद्र कांबळे* यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते-पाटील* यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रविंद्र कांबळे यांची निवड करण्यात आली. निवड झाल्याबद्दल मांजरी येथील नागरिकांनी त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी तहसीलदार सुधाकर मागाडे, सरपंच जयवंत जगताप, माजी सरपंच विद्यमान सदस्य अमृत उबाळे, डॉक्टर दादासाहेब जगताप, माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद उबाळे, किशोर जगताप पोलीस पाटील, गणेश जाधव, पिंटू जगताप, राहुल शिनगारे एलआयसी प्रतिनिधी, जब्बार मुजावर, सागर मौलाने, गुलाब पाटोळे, गणेश जाधव, नेताजी जाधव व अमोल कांबळे सर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
         "सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी मला दिलेल्या अत्यंत महत्वाच्या अशा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड करून  काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची व जबाबदारीची गोष्ट आहे. काँग्रेस पक्ष वाढीसाठी मी अत्यंत प्रामाणिकपणे, तळमळीने काम करून सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्ष वाढीचे काम करेन. काँग्रेस पक्षाच्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून बहुजन व सामान्य घटकातील लोकांना काँग्रेस पक्षांमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करीन. आपण आज माझा सत्कार केल्याबद्दल मी मांजरी गावातील विविध पदाधिकारी व अधिकारी वर्गाचा सर्वांचा ऋणी आहे." असे मत नुतन जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी व्यक्त केले.



Reactions

Post a Comment

0 Comments