संजय राऊतांचे भाजपवर हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप, सोमय्यांचा उल्लेख
मुंबई, (कटूसत्य वृत्त):- हरयणातील एक दूधवाला एस नरवाल यांच्याकडे सात हजार कोटींची संपत्ती असून त्याला फडणवीस सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवासस्थानातही मुक्तद्वार प्रवेश होता त्याच्याकडच्या संपत्तीत मधील साडे तीन हजार कोटी रुपये हे महाराष्ट्रातून गेल होते अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला. त्यांनी पंतप्रधान व गृहमंत्र्यांना पत्र लिहून सारी माहिती देणार असून त्या नंतरही तपास नाही झाला तर पुन्हा पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असाही इशारा त्यांनी दिला. महाराष्ट्र, झारखंड आणि बंगाल ही तीन राज्य सरकारने पाडण्यासाठी ईडी , सीबीआयचा वापर कऱण्यात येतो आहे असे सांगून राऊत म्हणाले की वीस दिवसांपूर्वी माझ्याकडे भाजपाचे काही नेते आले होते. तुम्ही सरकार पाडण्यासाठी मदत करा नाहीतर तुरुंगात जावे लागेल अशा धमक्या मला दिल्या. त्यांना मी स्पष्ट शब्दात नकार दिला तेंव्हा तीन दिवसांनी माझ्या नजीकच्या लोकावंर धाडी पडू लागल्या असे सांगून राऊत म्हणाले की पवार साहेबांच्या घरातील मुलींवर बहिणींवरही अशाच धाडी पडल्या. भावना गवळी, आनंद अडसूळ यांच्या सह अनिल परब यांच्या विरोधातही अशाच कारवाया केल्या जात आहेत ही सारी प्रकरणे खोटी आहेत . मला गोळ्या घाला वा तुरुंगात टाका, हा महाराष्ट्र आहे, तुम्ही शिवसेनेशी पंगा घेत आहेत असा इशारा देऊन राऊत म्हणाले की काहीही झाले तरी ठाकरे सरकार अजिबात पडणार नाही. १७० आमदारंचे बहुमत आमच्याकडे आहे. पण २०२४ ला तुमचे दिल्लीतील सरकार पडणार आहे नंतर काय होईल, तुम्ही कुठे जाल असाही इशारा त्यांनी भाजपा नेत्यांना दिला. भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा उल्लेख दलाल म्हणजे मराठीत भडवा अशा शब्दात सेनास्टाईल करून राऊत म्हणाले की पीएमसी बँकेच्या घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार राकेश वाध्वान याला ब्लॅकमेल करून सोमय्यांनी ८० ते शंभर कोटी रुपये रोख तर घेतलेच पण एक फ्रंटमॅन देवेन्द्र लघानी याला पुढे करून सोमय्या यांनी वाध्वा्च्या बांधकाम कंपनीकडून करोडो रुपयांच्या वसई येथील जमिनी साडे चार कोटी व सात कोटींना घेतल्या. आता वसईत निकॉन फेज वन व टू असा चारशे कोटींचा प्रकल्प सुरु असून नील सोमय्या हा किरीटचा मुलगा त्यात संचालक आहे. यांनी पीएमसी बँके घोटाळ्याचा थेट पैसा घेतला आहे त्याची चौकशी ईडीने करावी असे आव्हानही राऊत यांनी दिले. फडणवीस सरकाच्या कार्यकाळात महाआयटी या संस्थेत पंचवीस हजार कोटींचा घोटाळा झाला त्यातील अमोल काळे हा कोण आहे, त्याला कुठे लपवून ठेवले आहे असेही सवाल राऊत यांनी केले. ते म्हणाले की हा महाराष्ट्र आहे . ही शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला गुढगे टेकण्याची शिवकवण कधीही दिली नाही. तू काही पाप केले नाहीस , मग कुणाच्या बापाला घाबरू नको असे ठाकरेंचे सांगणे असे सांगून राऊत म्हणाले की पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सोमय्याच्या निकॉन प्रकल्पाच्या प्रयावरण तपासण्या कराव्यात महाराष्ट्र् आर्थिक गुन्हे शाखेने सोमय्याला पीएमसी घोटाळ्यता अटक करावी. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे असेही राऊत म्हणाले. ते असेही म्हणाले की ईडी कडे सारी कागदपत्रे गेले तीन महिने पाठवली आहेत पण आमच्या वीस वर्षांपूर्वीच्या जमीन खरेदी साठी ८० व्रषांच्या म्हाताऱ्यांना तरूण लहान मुलांना ऊईडीवाले उचलून आणतात याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. आपण १५ तारखेला दुपारी शिवसेना भवनात पत्रकार पिरषद घेणार अशी गर्जना सेना नेते व प्रवक्ते संजय राऊत यांनी केल्या नंतर गेले दोन दिवस राजकीय क्षेत्रात राऊत काय बोलणार याची मोठी उत्सुकता होती. नासिक, धुळे , पुणे अशा मुंबई बाहेरच्या भागातून शेकडो शिवसैनिक सेनाभवनात येऊन दाखल झाले होते. त्यांच्या सोयीसाठी सेनाभवनाच्या परिसरात मोठे टीव्ही स्क्रीन लावून लोकांना आत काय सुरु आहे हे ऐकण्याची पाहण्याची सोय करून देण्यात आली होती. दादर परिसरताील वाहतुक व्यवस्था साफ कोलमडली होती. साडेतीन नेत्यांना अनिल देशमुखांच्याच तुरुंगकोठडीत पाठवणार अशीही गर्जना राऊतांनी केली होती. शिवाय ही पत्रकार परिषद माझी नाही तर शिवसेनेची आहे, महाराष्ट्राची आहे असेही राऊत म्हणाले होते. मात्र त्यांनी थेट फारसे आऱोप केले नाहीत. पुढील काळात अशा आणखी पत्रकार परिषदा घेऊन भाजपा नेत्यांच्या आरोपांची मालिका करण्याचे सूतोवाच राऊत यांनी केले.
0 Comments