माती व पाणी परीक्षणावर भर द्या - शरद लाड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 16, 2022

माती व पाणी परीक्षणावर भर द्या - शरद लाड

 माती व पाणी परीक्षणावर भर द्या - शरद लाड

                                                    


कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- शेतकऱ्यांनी शेतात पिक लावण्याअगोदर  माती,पाणी परीक्षण करूनच रासायनिक खताचा वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हा परिषदेचे गटनेते शरद लाड यांनी केले. ते कापसेवाडी तालुका माढा येथील कृषिनिष्ठ पुरस्कार विजेते शेतकरी नितीन कापसे यांच्या द्राक्ष मळ्यात हुरडा पार्टी आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा विठ्ठल गंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन धनराज दादा शिंदे यांनी माढा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी माती पाणी व देठ परीक्षण प्रयोगशाळा उभा करून शेतकऱ्यांसाठी योग्य प्रकारची सोय केलेली आहे.धनराज दादा शिंदे शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटत असून त्यांच्या कार्याची दखल देशपातळीवर अनेक सामाजिक संस्थेने घेतली आहे.निश्चितच याचा तालुक्याला फायदा होईल असे ही त्यांनी सांगितले. यावेळी माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा विठ्ठल गंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चेअरमन धनराज दादा शिंदे,धनश्री लाड,राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ.आर.जी.सोमकुंवर,डॉ.नीता सोमकुंवर,कृषिनिष्ठ शेतकरी नितीन कापसे,डॉ.अजित पोकळे,डॉ‌.साधना पोकळे,डॉ.सुप्रिया गवळी,डॉ.मनीषा वरळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा,कृषी पर्यवेक्षक अनिल देशमुख,अखिल भारतीय सीताफळ महासंघाचे अध्यक्ष नवनाथ कसपटे, उद्योजक प्रवीण कसपटे,डॉ.विकास नाईकवाडे,डॉ.स्वाती नायकवाडे,प्रशांत पैकेकर,सुधीर बारबोले,माजी जिल्हा परिषद सदस्य झुंझार भांगे,राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष अनिता भांगे,अॅड. नितीन गुंड,पोपट खापरे,अॅड. केदार पवार,सरपंच शिवशंकर गवळी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages