कर थकबाकीदारांविरोधात मोहोळ नगर परिषदेची धडक कारवाई तीस मालमत्ता सील
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ नगरपरिषदेची एकूण थकबाकी ५ कोटी ८९ लाख रुपये आहे. ग्रामपंचायत कालावधीपासून ही थकबाकी थकीत आहे. मोहोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांनी पदभार घेतल्यापासून मोहोळ नगर परिषदेच्या करवसुली पथकाने तीन नोटिसा देऊन देखील थकबाकी न भरणाऱ्या तब्बल तीस थकबाकीदारांच्या मालमत्ता गेल्या दोन दिवसात नगर परिषदेच्या कर वसुली पथकाने सील केल्या. यामध्ये शहरातील अनेक प्रतिष्ठितांच्या घरांचा समावेश आहे. चार जानेवारी रोजी दहा आणि पाच जानेवारी रोजी वीस मालमत्ताधारकांवर नगरपरिषदेने कारवाई केली. यामध्ये २० हजारांपेक्षा जास्त कर वसुली थकीत असलेले अनेक थकबाकीदार मालमत्ताधारक आहेत. सील करताच खडबडून जागे झालेल्या मालमत्ताधारकांनी दोन दिवसात ३ लाख रुपयांच्या जवळपास कर थकबाकी भरून नगर परिषदेस सहकार्य केले आहे.
मोहोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.योगेश डोके यांनी कर थकबाकी वसूल करण्याची मोहीम अत्यंत प्रभावी पद्धतीने राबविली आहे. या मोहीमेला मोहोळ शहरातील सर्व स्तरातून चांगला पाठिंबा देखील मिळत आहे. मोहोळ नगर परिषदेचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांनी थकीत कर वसुलीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे कर वसुली विभागाने ९५ लाख रुपयांची करवसुली केली असल्याचे या विभागाकडून समजले. या करवसुली मोहिम पथकामध्ये स्वतः मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके, योगेश खराडकर, रोहित कांबळे, योगेश सूर्यकांत डोके, महेश माने, राजकुमार सपाटे, संगीता कुंभार,दिलीप जाधव, दिनेश गायकवाड, महेश भोसले,कार्तिक जाधव, चंद्रकांत गायकवाड,किशोर स्वामी, कोंडीबा देशमुख, बालाजी काटकर इत्यादी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
अनेक वर्षापासून कर थकबाकी न भरणाऱ्याची
मालमत्ता सील करण्याची कारवाई टाळण्यासाठी सर्वांनी स्वयंस्फूर्तीने नगरपरिषदेत येऊन आपली कर बाकी भरावी. यापुढील काळात कर थकबाकी न भरणाऱ्यांची गय केली जाणार नाही. स्वयपाक घर सोडून सर्व मालमत्ता सील करणार.
डॉ. योगेश डोके
मुख्याधिकारी मोहोळ नगरपरिषद.
0 Comments