हेल्मेट वापराच्या जनजागृतीसाठी महिला पोलिसांची मोटर सायकल रॅली
पोलीस आयुक्त हरीशकुमार बैजल सह महिला पोलीस अधिकारी , कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर पोलीस आयुक्तालयाकडून हेल्मेट वापरासंबंधी जनजागृती करिता सोलापुरात महिला पोलिसांच्या मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं.या रॅलीत स्वतः पोलीस आयुक्त हरीशकुमार बैजल यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून मोटरसायकलवरून राईड केली.वाहतूक नियमांबाबत केंद्राकडून दंडाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे.त्या अनुषंगाने पोलिस आयुक्त बैजल यांनी 28 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान वाहनधारकांसाठी जनजागृती मोहिमेचा आयोजन केले होते.यावेळी वाहतूक नियमांबाबत वाहनधारकांना मध्ये जनजागृती करण्यात आली.तरी देखील वाहनधारकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागृती होत नसल्याने 3 जानेवारी पासून मात्र सध्या सोलापूर शहरातील चौकाचौकांमध्ये केंद्राच्या वाढीव दंडासह वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.हेल्मेट नसल्याने अपघातादरम्यान वाहनधारकांचे ओढवणारे मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने वाहनधारकांना स्वसंरक्षणासाठी हेल्मेट वापरा बाबत जनजागृती व्हावी या हेतूने मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी पोलीस मुख्यालयापासून सोलापूर शहरांमध्ये सुरू झालेल्या मोटारसायकल रॅलीत स्वतः पोलीस आयुक्त हरीशकुमार बैजल , उपायुक्त वैशाली कडूकर , दिपाली घाटे , सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे आदींसह मोठ्या संख्येने महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
0 Comments