Hot Posts

6/recent/ticker-posts

शेततळ्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू : मार्डी गावातील घटना

 शेततळ्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू : मार्डी गावातील घटना




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी या गावामध्ये येथे शेतातील शेततळ्यांमध्ये पाणी पिण्यास गेलेल्या मुलींचा पाय घसरून त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली.
१)सानिका सोनार अंदाजे वय १७,२)पुजा सोनार अंदाजे वय १३, व ३)आकांक्षा युवराज वडजे वय ११ असे बुडून मरण पावलेल्या मुलींची नावे आहेत. गावातील सदाशिव जगताप यांच्या शेतातील शेततळ्यात ही घटना घडली. त्या तीन मुली पाणी  पिण्यास गेल्या होत्या त्यांचा पाय घसरला आणि बुडून त्या 3 मुलीचा मृत्यु झाला आहे. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेने मराठी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रानात जळण गोळा करायला गेल्या होत्या, तहान लागल्याने पाणी पिण्यास शेततळ्यात उतरल्या आणि ही घटना घडली अशी ही माहिती मिळत आहे.



Reactions

Post a Comment

0 Comments